Home उतर महाराष्ट्र संजय चोखाजी दुशिंग . अयुर्वेदिक वैद्य विशारद.(AVV) जिल्हा कुष्ठरोग पर्यवेक्षक सहाय्यक संचालक...

संजय चोखाजी दुशिंग . अयुर्वेदिक वैद्य विशारद.(AVV) जिल्हा कुष्ठरोग पर्यवेक्षक सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग ) यांना पुरस्कार प्रदान

52
0

आशाताई बच्छाव

IMG_20240311_084816.jpg

संजय चोखाजी दुशिंग .
अयुर्वेदिक वैद्य विशारद.(AVV)
जिल्हा कुष्ठरोग पर्यवेक्षक
सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग ) यांना पुरस्कार प्रदान
अहमदनगर, दिपक कदम तालुका प्रतिनिधी –महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा
डॉ. राजेंद्र खंडागळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यत कुष्ठ रुग्ण सेवेत कार्यरत
महामानव बाबा आमटे,मदर तेरेसा ,महात्मा गांधी याच्या कडुन रुग्ण सेवेची प्रेरणा घेऊन गेली 35 वर्ष कुष्ठ रुग्ण सेवेत कार्यरत .
महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली , मिरज ,इचलकरंजी, गडचिरोली, देसाईगंज वडसा नागपूर जिल्ह्यातील आदिवासी भागात तसेच नाशिक,सिन्नर ,अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर,खर्डा,श्रीरामपूर,आकोले तालुक्यातील आदिवासी भागात कुष्ठरोग विषयी जनजागृती, आरोग्य शिक्षण,आरोग्य तपासणी शिबीरे,कुष्ठरोग विषयी चित्र प्रदर्शन, घरोघर सव्हैक्षण निबंध स्पर्धा, प्रश्न मंजुषा स्पर्धा ,सायकल रँली,वर्तमान पत्रामधिल प्रबोधन पर लेख ,खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांची कार्य शाळा,याद्धारे जानीव जाग्रुती निर्माण करुन प्राथमिक आवस्थेतील कुष्ठ रुग्णांना शोधून त्यांना उपचाराखाली आणून विक्रुती शिवाय त्याना रोगमुक्त करण्या साठि विषेश प्रयत्न केले.कुष्ठ रुग्णांच्या विकोपाला गेलेल्या,किडेपडलेल्या जखमा हाताने धुवून स्वच्छ करुन त्यांना मलमपट्टी करुन जखमा बऱ्या केल्या.
भौतिक उपचाराचे विषेश प्रशिक्षण घेऊन विक्रुती कुष्ठ रुग्णांना भौतिक उपचार देऊन त्यांच्या विक्रुती दुरुस्त करुन कुष्ठ रुग्णांना सामाजिक प्रवाहात समिल होण्यासाठी त्यांचा आत्मविश्वास वाढवला.
कुष्ठ रुग्णाच्या जीवनात आनंद आणि कुष्ठ रुग्णांचे जीवन सुखमय होण्यासाठी त्याचे आर्थिक, सामाजिक वैद्यकीय पुर्नरवसन होण्यासाठी विषेश उपक्रम राबविले,
रंजलेल्या गांजलेल्या सामाजाने वाळीत टाकलेल्या कुंटूबाने उपेक्षित केलेल्या कुष्ठ रुग्णांना मायेचा आधार देऊन विविध शासकीय योजनांचा लाभ त्याना मिळवून दिला .कुष्ठ रुग्णांना व त्याच्या पाल्यांना कौशल्य प्रशिक्षण करिता प्ररूत्त करुन त्यांना स्वतः च्या पायावर उभे राहण्यासाठी मार्गदर्शन केले.
गेली 35 वर्षांपासून हि कुष्ठ रुग्ण सेवा आजतागायत अविरत सुरू आहे.
दि.9 मार्च 2024 रोजी महाराजा प्रतिष्टान व सोशल सर्व्हिसेस फाऊंडेशन याच्या वतीने कुष्ठ रुग्ण सेवेबद्दल “अतुल्य सेवा सन्मान पुरस्कार ” मा.राधाकृष्ण विखे पाटील ,महसुल, पशुसंवर्धन, व दुग्ध व्यावसाय विकास तथा पालकमंत्री अहमदनगर यांच्या शुभहस्ते व मा.शेखरभाऊ मुदडा ,अध्यक्ष महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोग संस्थापक महाएनजीओ फेडरेशन यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या कुष्ठ रुग्ण सेवे करिता शासकीय ,निमशासकीय, सामाजिक संस्था च्या माध्यमातून आनेक पुरस्काराने संन्मानित करण्यात आले आहे.
सहाय्यक संचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग अहमदनगर कार्यालयाच्या वतीने ” वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार – 2024″ करिता शिफारस करण्यात आली आहे.

Previous articleमहसूल मंत्री विखे यांच्यासह पटारे व दिनकर यांचा शिवप्रेमींच्या वतीने नागरी सत्कार
Next articleमहासभा एकनिष्ठेची!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here