• Home
 • रेल्वे मंत्र्यांकडून मोठी घोषणा! १ जून पासून दररोज २०० विशेष गाड्या धावणार

रेल्वे मंत्र्यांकडून मोठी घोषणा! १ जून पासून दररोज २०० विशेष गाड्या धावणार

 • ⭕ रेल्वे मंत्र्यांकडून मोठी घोषणा!
  १ जून पासून दररोज २०० विशेष गाड्या धावणार ⭕
  ( विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

  नवी दिल्ली : देशभरात अडकलेल्या गरीब मजुरांना दिलासा देण्यासाठी रेल्वेनं मोठी घोषणा केली आहे. मजुरांना सोडण्यासाठी सध्या श्रमिक विशेष रेल्वे सुरू आहेत. यानंतर आता रेल्वे देशभरात मेल एक्स्प्रेस ट्रेन्स सुरू करण्याच्या तयारीत आहे. रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी ट्विट करून याबद्दलची माहिती दिली आहे. १ जूनपासून दररोज २०० स्पेशल रेल्वे गाड्या वेळापत्रकानुसार सोडल्या जाणार असल्याचं गोयल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. या गाड्यांसाठी ऑनलाईन बुकिंग करता येईल.

  १ जूनपासून देशभरात २०० विशेष मेल एक्स्प्रेस चालवल्या जाणार असल्याची माहिती पीयूष गोयल यांनी ट्विट करून दिली.

  या गाड्या वेळापत्रकानुसार धावतील. या गाड्यांमध्ये वेटिंग लिस्टचा पर्याय असेल. मात्र तत्काळ किंवा प्रीमियम तत्काळसारखे पर्याय उपलब्ध नसतील. आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरुन ट्रेनच्या तिकिटांचं बुकिंग करता येईल. ट्रेन बुकिंग केव्हापासून सुरुवात होईल, याची माहिती लवकरच दिली जाईल.

anews Banner

Leave A Comment