• Home
  • म्हाळुंगे- येथील श्री. शिवछत्रपती क्रीडा संकुलात १ हजार बेडस् तयार

म्हाळुंगे- येथील श्री. शिवछत्रपती क्रीडा संकुलात १ हजार बेडस् तयार

  • ⭕ म्हाळुंगे- येथील श्री. शिवछत्रपती क्रीडा संकुलात १ हजार बेडस् तयार ! ⭕
    पुणे ( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

    पुणे : शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आपल्या पुणे महापालिकेच्या वतीने १००० बेड्सचे ‘आयसोलेशन सेंटर’ म्हाळुंगे येथील श्री. शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे उभारण्यात आले आहे. रुग्णांसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सेवा सुविधा येथे उपलब्ध करुन दिल्या आहेत.

    आज प्रत्यक्ष आयसोलेशन सेंटरला भेट देऊन पाहणी केली. भविष्यात जर गरज लागली तर आलेल्या परिस्थितीला सामना देण्यासाठी या सेंटरची उभारण्यात करण्यात आली आहे, परंतु याची गरज लागू नये, हिच अपेक्षा.

    यावेळी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल, शांतनु गोयल, तसेच पालिकेतील इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

anews Banner

Leave A Comment