Home परभणी मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या शेती व नागरीकांच्या घरांची आमदार मेघना बोर्डीकर यांनी...

मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या शेती व नागरीकांच्या घरांची आमदार मेघना बोर्डीकर यांनी केली पहाणी

124

आशाताई बच्छाव

IMG-20220625-WA0041.jpg

मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या शेती व नागरीकांच्या घरांची आमदार मेघना बोर्डीकर यांनी केली पहाणी

शत्रुघ्न काकडे पाटील:- ब्युरो चीफ परभणी (युवा मराठा न्युज नेटवर्क)

(परभणी)जिंतूर :-तालुक्यातील वाघी, धानोरा, वडी शिवारात शुक्रवारी २४ जून रोज दोन तास झालेल्या मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीची व नागरिकांच्या घरांची सायंकाळी सातच्या सुमारास जिंतूरच्या आमदार मेघना बोर्डीकर यांनी पाहणी केली.

दरम्यान यासंदर्भात प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करुन संबधितांना दिलासा देण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याची ग्वाही दिली. शुक्रवारी सायंकाळी वाघी, धानोरा, वडी परिसरात ढगफुटी सदृश्य दोन तास मुसळधार पाऊस झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते.

काही वेळातच या पावसामुळे जमिनीवरुन अर्धा फुट पाणी वाहू लागल्याने शेतकऱ्यांनी शेतीत नुकतीच पेरणी केलेल्या जमिनी खरडून गेल्या. त्यामुळे संबधित शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. या पावसाने अनेकांच्या राहत्या घरात पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. दरम्यान, यासंदर्भात माहिती मिळताच आमदार मेघना बोर्डीकर यांनी शुक्रवारी २४ जून रोजी संध्याकाळी सातच्या सुमारास लागलीच संबधित गावाना भेटी देऊन परिस्थितीची पाहणी केली.

याप्रसंगी नायब तहसीलदार ओमप्रकाश घोंगडे, मंडळ अधिकारी जाधव, सरपंच माधव पवार, सरपंच सुदामराव गायकवाड, गणेश गायकवाड, किसनराव गायकवाड, माऊली गायकवाड, कैलास खंदारे, सखाराम गायकवाड, गजानन बारबिंडे, अविनाश चव्हाण, . वडीचे सरपंच संजय पवार, . शिवाजीराव साईंदे, पोलीस पाटील सुभाष पवार, विष्णूपंत पवार, महादेव पवार, बद्रीनाथ पवार, मदन पवार, केदार पवार याच्यासह वाघी धानोरा, वडी गावातील शेतकऱ्याची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

Previous articleबस अभावी ग्रामीण भागातील विद्यार्थीनींची गैरसोय
Next articleआमदार संजूभाऊ गायकवाड पक्का शिवसैनिक!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.