Home नाशिक रुई-देवगाव-कानळद नैसर्गिक नाला नूतनीकरणाच्या कामास प्रारंभ–

रुई-देवगाव-कानळद नैसर्गिक नाला नूतनीकरणाच्या कामास प्रारंभ–

72
0

आशाताई बच्छाव

IMG-20230512-WA0016.jpg

रुई-देवगाव-कानळद नैसर्गिक नाला नूतनीकरणाच्या कामास प्रारंभ–

माजी उपमुख्यमंत्री आ.छगन भुजबळांनी लावला १५ वर्षापासूनचा प्रलंबित प्रश्न मार्गी–

दैनिक युवा मराठा
रामभाऊ आवारे निफाड

रुई,देवगाव,कोळगाव, कांदळस या चार गावाच्या परिसरातील पाचशे हेक्टर शेतीला वरदान ठरणारी देवगाव नाला नंबर १५ वरील नैसर्गिक नाल्याचे नूतनीकरणाचे रखडलेले काम सुरु करण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री आ.छगन भुजबळांनी केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे.पाटबंधारे विभागाने नाला नूतनीकरणाच्या कामाला सुरुवात केल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहे.
विंचूर,डोंगरगाव,नांदगाव,धानोरे,भरवस फाटा,मानोरी,रुई,महादेवनगर या गावाच्या परिसरातील पाऊसाचे पाणी कोळगाव,देवगाव,कानळद परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात येते.ते पाणी गोदावरी नदीच्या पात्रात वाहून जाण्यासाठी चर योजनाच अस्तित्वात नसल्यामुळे ते पाणी शेतकऱ्यांच्या शेतात तुंबते.परिणामी दरवर्षी परिसरातील पाचशे हेक्टर शेतातील शेतीपिकांचे नुकसान होत असल्याच्या तक्रारी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यासह प्रशासनाकडे आल्या.दरवर्षी होत असलेल्या नुकसानीची गंभीर दखल घेत आ.भुजबळांनी जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी,प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत प्रश्न निकाली काढण्याचे आदेश दिले होते.त्यानुसार अधिकाऱ्यांनी चर,नाल्यांचे तात्काळ सर्वेक्षण केले.त्यामुळे साधारण १५ वर्षापासून प्रलंबित असलेल्या देवगाव-खेडला चर योजनेच्या योजनेचे काम नुकतेच झाले.परंतु उर्वरित देवगाव नाला नंबर १५ वरील नैसर्गिक नाल्याचे नूतनीकरणाचे काम रखडले.याबाबत शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने आ.भुजबळांची भेट घेत रखडलेले कामाची माहिती दिली.दरम्यान आ.भुजबळांनी गंभीर दखल घेत कार्यकारी अभियंता सागर शिंदे यांना केलेल्या सूचनेनुसार रखडलेल्या नैसर्गिक नाल्याच्या कामास सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.आ.भुजबळांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे,माजी प.स.सदस्य भाऊसाहेब बोचरे,माजी सरपंच विनोद जोशी,वैभव तासकर यांच्या पाठपुराव्याला यश आले असुन त्यांच्या हस्ते शेतकऱ्यांसह कामाचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी माजी उपसरपंच केदारनाथ तासकर,बापू तासकर,गणेश तासकर,कृष्णा गायकवाड,शुभम तासकर,बाळू तासकर,शंकर गाढे,अशोक रोटे,भाऊसाहेब तासकर,सुरेश तासकर,अमोल तासकर आदीसह शेतकरी उपस्थित होते.

@माजी उपमुख्यमंत्री आ.छगन भुजबळांच्या सूचनेनुसार खेडला-देवगाव चर योजनेचे काम नुकतेच झाले असून नाला नंबर १५ वरील नैसर्गिक नाल्याचे काम चर योजनेपर्यंत पूर्ण झाल्यास पाचशे हेक्टर क्षेत्रातील शेतपिकांचे नुकसान होणार नाही.त्यामुळे शेतकऱ्यांनी एकत्र येत विनाअडथळा काम पूर्ण करून घ्यावे. *बाळासाहेब लोखंडे–स्वीय सहाय्यक*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here