Home संपादकीय संपादकीय..                       ...

संपादकीय..                                        सांळुखेच्या काळात गाजले हाताणे,लेंडाणे अन व-हाणे पुन्हा पुन्हा! आता टोकडेतही होणार का तोच गुन्हा?   

166
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20230512-WA0000.jpg

 

.संपादकीय..                                        सांळुखेच्या काळात गाजले हाताणे,लेंडाणे अन व-हाणे पुन्हा पुन्हा! आता टोकडेतही होणार का तोच गुन्हा?                     वाचकहो,                                                        व-हाणे प्रकरणात ग्रामसेविका श्रीमती सुवर्णा सांळुखेंनी केलेल्या अनागोंदी कर्तबगारीमुळे या गावाचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात गाजतंय…नसलेले अधिकार ही वापरुन मनमानी पध्दतीने कायदाच धाब्यावर बसवून श्रीमती सुवर्णा सांळुखेंनी प्रशासनाच्या अब्रुचे पार लक्तरे टांगून ठेवली आहेत.याच ग्रामसेविका श्रीमती सुवर्णा सांळुखेची कारकिर्द सातत्याने वादग्रस्तच ठरलेली आहे.ज्या गावात जातील तेथे त्यांच्या बेताल कारभाराचा फटका सगळ्यांनाच भोगावा लागतो.अगोदर हाताणे गावात शौचालय प्रकरणात गैरव्यवहार तर नंतर लेंडाणे प्रकरणात प्रत्येक शौचालय लाभार्थाकडून तीन -तीन हजार रुपये घेतल्याचा आरोप तेथील तत्कालीन महिला सरपंचानी केला होता.असे असले तरी व-हाणे गावात सुध्दा सांळुखेची करामत काही साधी सोपी नव्हती.दस्तुरखुद्द तेथील तत्कालीन महिला सरपंच श्रीमती संगिता पवार यांनाही सांळुखेच्या कर्तबगारीचे भोग भोगावे लागत आहेत.त्याशिवाय व-हाणे गावात काम करताना “हम करे सो कायदा” या न्यायाने व गावाचे आपणच मालक आहोत या धुंदीत गावाचा पुर्ण सत्यनाश सांळुखेंनी लावून ठेवला,गावात त्यांच्या कार्यकाळात शासनाच्या मालमता निर्लिखित न करता बेकायदेशीर अतिक्रमण वाढले.आपल्याच मर्जीतल्या लोकांना गावातील जागा आपल्याच बापाच्या जहागिरी सारख्या मोकाट वाटून ठेवल्यात.असे एक ना अनेक करामती ग्रामसेविका सांळुखेंच्या कार्यकाळात वरील तिघांही गावात घडल्यात.असे असतानाही आम्ही गेल्या तीन वर्षापासून व-हाणे प्रकरणावर व सांळुखेच्या अकर्तबगारीवर लढा पुकारलेला असताना पंचायत समितीने मात्र पुन्हा सांळुखेच्या हवाली टोकडे गाव आंदण केल्याचे स्पष्ट झाले आहे.जोपर्यंत प्रशासनाची कार्यवाही पुर्ण होत नाही,तोपर्यंत सांळुखेंना कुठलेही गाव देण्यात येऊ नये त्यांचे मुख्यालय असलेल्या व-हाणेतच त्यांना पुन्हा सेवेत रुजू होण्याचे आदेश काढावेत या आमच्या लेखी मागणीला प्रशासनाने स्थान देऊन दखल न घेता.पुन्हा सांळुखेसारख्या अति कर्तबगार ग्रामसेविकेला टोकडे गावात नियुक्ती दिली असली,तरी अगोदरच टोकडे गाव विविध प्रश्नावर धगधगत आहे,आणि त्या गावात सांळुखेंना पाठवून पुन्हा तेथे काही गुन्हा होणारच नाही याची जबाबदारी प्रशासन घेईल का? हाच महत्त्वाचा मुद्दा यानिमिताने उपस्थित होतो.अन्यथा या सगळ्या गैर कारभारावर लक्ष ठेवायला विठोबा हजरच आहे,पंढरीचा नव्हे….टोकडेतील विठोबा ध्यानध्यान याची काळजी घेतली तरी प्रशासनाला उशिरा सुचलेले शहाणपण म्हणण्याची अनाठायी वेळ मात्र येऊ नये,एव्हढेच यानिमिताने!

Previous articleरुई-देवगाव-कानळद नैसर्गिक नाला नूतनीकरणाच्या कामास प्रारंभ–
Next articleशेवरेत आदिवासी जनजागृती मेळावा उत्साहात संपन्न
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here