Home नांदेड नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असतानाच त्यात अवकाळी पावसाने आणखी भर घातल्याने...

नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असतानाच त्यात अवकाळी पावसाने आणखी भर घातल्याने शेतकऱ्यांची दाणादाण उडविली

184
0

राजेंद्र पाटील राऊत

नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असतानाच त्यात अवकाळी पावसाने आणखी भर घातल्याने शेतकऱ्यांची दाणादाण उडविली

मुखेड तालुक्यातील विविध भागातील शिवारात वादळी वाऱ्यासह पावसाने हाताशी आलेल्या टाळकी ज्वारी चे मोठ्या प्रमाणात नुकसान

मुखेड ता.प्र./ संग्राम पाटील तांदळीकर/युवा मराठा न्युज नेटवर्क

नैसर्गिक आपत्तीमुळे अगोदरच शेतकऱ्यांचे कंबरडे मोडलेले आहे. खरीप हंगाामात झालेल्या नुकसानाची भर रब्बी हंगामात काढण्याच्या तयारीत शेतकरी असतांना अवकाळी पावसाने दाणादाण उडविली आहे. राज्यासह मराठवाड्यातील विविध भागासह विशेषतः नांदेड जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे तर काही भागांमध्ये ढगाळ वातावरणामुळे शेतकर्‍यांच्या टाळकी ज्वारी,तुर,हरभरा,कांदा,मका, गहू, या रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांची सर्व बाजूने कोंडी होत आहे. आता रब्बी हंगामातील पिकांची कुठे उगवण झाली होती. मात्र, अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे पिकांचे नुकसान होत आहे. तर अवकाळी पाऊसाने शेतकऱ्यांच्या अडचणीत पुन्हा भर टाकली आहे.उर्वरीत कापसाचेही नुकसानच कापूस, मका कांदा इत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. खरीप हंगामात झालेल्या नुकसानाची शेतकर्‍यांना तुटपूंजी मदत मिळाली. आता पुन्हा बँकाचे कर्ज काढून रब्बी हंगामाला सुरुवात शेतकऱ्यांनी केली होती. लागणीला आलेली रोपांसह कांदा, मका, गहू, टाळकी ज्वारी,हरभरा या रब्बी हंगामातील पिकांवरही अवकाळी पावसाने पाणी फिरविले. त्यामुळे आता शेती करायची कशी? असा सवाल मुखेड तालुक्यातील शेतकरी उपस्थित करीत आहेत.जिल्ह्यात कापसाचे उत्पादन बऱ्यापैकी घेतले जाते. पण कापासाची तोडणी सुरु असतनाच अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान न भरुन निघण्यासारखे आहे. काल झालेल्या मुखेड तालुक्यातील विविध भागातील शिवारात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हाताशी आलेली टाळकी ज्वारी चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here