Home नांदेड पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते जिल्ह्यातील तृतीयपंथीयांना ओळखपत्राचे वितरण • समाज कल्याणच्या...

पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते जिल्ह्यातील तृतीयपंथीयांना ओळखपत्राचे वितरण • समाज कल्याणच्या वेबसाईटचे लोकार्पण

68
0

राजेंद्र पाटील राऊत

पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते जिल्ह्यातील तृतीयपंथीयांना ओळखपत्राचे वितरण
• समाज कल्याणच्या वेबसाईटचे लोकार्पण

नांदेड (मनोज बिरादार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) :- जिल्ह्यातील तृतीयपंथीयांना सन्मानाने जगता यावे व त्यांना आवश्यक त्या भौतिक सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्याच्यादृष्टीने तृतीयपंथीयांना ओळखपत्राचे वाटप पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते आज करण्यात आले. तृतियपंथ्यांच्या कल्याणासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले. यावेळी गौरी बक्ष व इतर सहा तृतियपंथ्यांना प्रतिनिधिक स्वरुपात ओळखपत्राचे वाटप करण्यात आले. तृतीयपंथीयांच्या स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लागला असून लवकरच नांदेड येथे किन्नर भवन उभारण्यात येणार आहे. त्यांना देण्यात येत असलेल्या सोई-सुविधेची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी यावेळी दिली.
समाज कल्याण विभागाच्या samajkalyannaded.in या वेबसाईटचे लोकार्पण पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली तर प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार यांच्या सहकार्याने सामाजिक न्याय विभागाच्या वैयक्तिक व सामुहिक योजना या ऑनलाईन पद्धतीने राबविण्यासाठी ही वेबसाईट सुरु करण्यात आली आहे.
समाजकल्याण विभागाच्या व्हीजन डॉक्युमेंटचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले. यात पुढील पाच वर्षात सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचे नियोजन संक्षिप्त स्वरुपात नमूद करण्यात आले. यासाठी समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर, समाज कल्याण अधिकारी बापू दासरी, डी. आर. दवणे, रामदास पेंडकर, अमरदीप गोधणे यांनी परीश्रम घेतले.

Previous articleनैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असतानाच त्यात अवकाळी पावसाने आणखी भर घातल्याने शेतकऱ्यांची दाणादाण उडविली
Next articleजिल्हाधिकाऱ्यांचे आदेश;रात्री संचारबंदी व दिवसा जमावबंदी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here