Home रत्नागिरी फुणगूस येथे झळकले मंत्री उदय सामंत यांच्या अभिनंदनाचे फलक

फुणगूस येथे झळकले मंत्री उदय सामंत यांच्या अभिनंदनाचे फलक

32
0

आशाताई बच्छाव

IMG-20220812-WA0014.jpg

फुणगूस येथे झळकले मंत्री उदय सामंत यांच्या अभिनंदनाचे फलक                                             रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

राजकारणात कोणीही कोणाचाही कायमचा शत्रू किंवा कायमचा मित्र नसतो ही गोष्ट सर्वश्रुत आहे. पण आज संगमेश्वर तालुक्यातील खाडीपट्ट्यातील फुणगूस येथे नागरिकांना अनुभवता आले.
संगमेश्वर-रत्नागिरी विधानसभेचे आमदार श्री. उदय सामंत यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आणि मागील अडीच वर्षे त्यांचे विरोधक म्हणून काम करणारे संगमेश्वर तालुका भाजप उपाध्यक्ष, युवा नेते मिथुन निकम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सामंत यांचे अभिनंदन करणारा फलक फुणगूस येथे लावला आहे.

युती म्हणुन आम्हीही उदय सामंत यांचा प्रचार केला होता. मात्र त्यांनी पक्षाचा आदेश मानून भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जाण्याची भूमिका घेतली. यामुळे आम्हीही आमच्या पक्षाची बाजू मांडून आमच्या नेतृत्वाला साथ दिली. आता सामंत साहेब शिवसेनेच्या मुख्य गटासोबत आहेत, आणि हा गट आमच्यासोबत आहे. त्यामुळे आम्ही सामंत साहेबांचे सहकारी आहोत आणि त्यांचे अभिनंदन करणे हे आमचे कर्तव्य आहे. अशी प्रतिक्रिया मिथुन निकम यांनी यावेळी दिली.

Previous articleवनौशी पंचनदी येथील ग्रामस्थांनी घेतली आ. योगेश कदम यांची भेट
Next articleरक्षाबंधनासाठी जात असलेल्यांची बोट बुडाली, ३५ जण बेपत्ता
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here