Home Breaking News रक्षाबंधनासाठी जात असलेल्यांची बोट बुडाली, ३५ जण बेपत्ता

रक्षाबंधनासाठी जात असलेल्यांची बोट बुडाली, ३५ जण बेपत्ता

49
0

आशाताई बच्छाव

IMG-20220812-WA0013.jpg

रक्षाबंधनासाठी जात असलेल्यांची बोट बुडाली, ३५ जण बेपत्ता                                                     बांदा,(उतरप्रदेश युवा मराठा न्युज नेटवर्क)

रक्षाबंधनासाठी जात असलेल्यांची बोट यमुना नदीत पलटी होऊन ३५ जण बेपत्ता झाल्याची घटना उत्तरप्रदेशमधील बांदा येथे ही घडली आहे. बुडालेल्यांपैकी तिघांची मृतदेह हाती लागले असून या बोटीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करत होते.

या बोटीमध्ये एकूण ५० लोक प्रवास करत होते. त्यात २० ते २५ महिला व मुलेही होती. या महिला रक्षाबंधनासाठी माहेरी जात होत्या. या बोटीतील ३५ जण बेपत्ता आहेत. त्यातील तीन जणांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आल्याचे माहिती प्रशासनाने दिले. गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान ही दुर्घटना घडली.

नदीच्या मध्यभागी गेल्यानंतर बोटीमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झाली. बोट बुडण्याची धोका दिसल्यानंतर काही प्रवाशांनी नदीत उडी मारली. यामुळे बोटीमध्ये आणखीन गोंधळ उडाला. त्यानंतर ही बोट संपूर्णपणे नदीत बुडाली. तर त्यातील महिला आणि लहान मुले ही बेपत्ता झाली. दोन महिला आणि एक मुलाचा मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आला. इतरांचा शोध सुरू आहे.

Previous articleफुणगूस येथे झळकले मंत्री उदय सामंत यांच्या अभिनंदनाचे फलक
Next articleमापारी मोहल्ला उर्दू शाळेत विविध उपक्रमांद्वारे “हर घर तिरंगा” जनजागृती मोहिम
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here