Home गुन्हेगारी तिवरींच्या झाडांची कत्तल केल्या प्रकरणी पंचनामा झाला मात्र पुढील कारवाई गुलदस्त्यातच! पंचनामा...

तिवरींच्या झाडांची कत्तल केल्या प्रकरणी पंचनामा झाला मात्र पुढील कारवाई गुलदस्त्यातच! पंचनामा सार्वजनिक करण्याची नागरिकांची मागणी!

96
0

राजेंद्र पाटील राऊत

तिवरींच्या झाडांची कत्तल केल्या प्रकरणी पंचनामा झाला मात्र पुढील कारवाई गुलदस्त्यातच!
पंचनामा सार्वजनिक करण्याची नागरिकांची मागणी!
पालघर(वैभव पाटील विभागीय संपादक युवा मराठा न्युज नेटवर्क)– पालघर तालूक्यातील शिरगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत समुद्र किनारी असलेल्या गट क्रमांक-1310 ला लागुन असलेल्या 1287 या वन विभागाच्या अखत्यारित असलेल्या जमिनीवर जमिनीची साफ-सफाई करताना नरेंद्र दुबे यांनी तिवरींच्या झाडांची तोड केली होती.
या बाबत ग्रामपंचायत शिरगाव यांच्या वतीने कारवाई करण्या करीता पालघरचे तहसिलदार सुनिल शिंदे यांना लेखी पत्राद्वारे कळविण्यात आले होेते. त्याप्रमाणे 31 जानेवारी रोजी दुपारी उशीराने संबंधित सर्व विभागाचे प्रतिनिधी-अधिकारी यांच्या उपस्थितीत तहसिलदार पालघर यांनी वस्तुस्थितीचा पंचनामा केला होता. त्यावेळी तिवरींच्या झाडांची व बंदी असलेल्या काही झाडांची कत्तल झाल्याचे पुरावे समोर आले होते. या वस्तुस्थितीचे चित्रीकरण ही करण्यात आले होते.
वस्तुस्थितीच्या पंचनाम्यावर उपस्थित नागरिकांच्या व जबाबदार अधिकार्‍यांच्या सह्या ही घेण्यात आल्या होत्या. मात्र पंचनाम्याची प्रत ग्रामपंचायती सह इतर कोणालाही देण्यात आली नव्हती. त्यामुळे पुढील कारवाई होणार की नाही याकडे येथील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
या संदर्भात अद्याप पर्यंत कुठलीही कारवाई झालेली नाही. तहसिलदार सुनिल शिंदे यांनी पत्रकारांनी या विषयी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले की, वस्तुस्थितीचा पंचनामा पंचासमक्ष केलेला आहे. कांदळवन संरक्षण समितीचे अध्यक्ष हे उपविभागीय अधिकारी धनाजी तोरस्कर हे आहेत. त्यामुळे पुढील कारवाई ते करणार आहेत. प्रकरण त्यांच्याकडे पाठविल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान सरपंच शिरगाव यांनी पंचनाम्याची प्रत स्थानिक ग्रामपंचायतीला देणे गरजेचे असताना ती दिलेली नाही. असे सांगितले. या प्रकरणावर तहसिलदारांनी व संबंधित विभागांनी कारवाई न केल्यास अश्या प्रकरणात प्रचंड वाढ होईल आणि त्यामुळे संपूर्ण समुद्र किनाराच धोक्यात येईल त्यामुळे कारवाई झालीच पाहीजे असे ग्रामपंचायतीचे उपसरपंच इमरान दांडेकर यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले.

Previous articleशेळगांव गौरी च्या रितेश वाघमारे ची मेडीकल एमबीबीएस साठी पात्र.
Next articleडांगसौंदाणेत सट्टा माफीया दाऊदची करामत; पैसा फेको तमाशा देखो..!! पोलिसही काही करुच शकत नाहीतच्या वल्गना…!!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here