Home गुन्हेगारी डांगसौंदाणेत सट्टा माफीया दाऊदची करामत; पैसा फेको तमाशा देखो..!! पोलिसही काही करुच...

डांगसौंदाणेत सट्टा माफीया दाऊदची करामत; पैसा फेको तमाशा देखो..!! पोलिसही काही करुच शकत नाहीतच्या वल्गना…!!

240
0

राजेंद्र पाटील राऊत

डांगसौंदाणेत सट्टा माफीया दाऊदची करामत; पैसा फेको तमाशा देखो..!!
पोलिसही काही करुच शकत नाहीतच्या वल्गना…!!
(राजेंद्र पाटील राऊत युवा मराठा न्युज नेटवर्क)
मालेगांव– सटाणा आणि कळवण तालुक्याच्या सीमारेषेवर वसलेल्या डांगसौंदाणे या बाजारपेठेच्या गावाजवळील बुंधाटे सरकारी वस्तीगृहाजवळ दाऊदचा सट्टा मटका जुगार बिनदिक्कतपणे स्थानिक पोलिस प्रशासनाच्या आशिर्वादाने सुरु आहे, त्यमुळे दाऊद हा पोलिसही माझे काहीच करु शकत नसल्याच्या बेताल वल्गना करीत पैश्यांच्या जोरावर स्वतः चे अवैध धंद्यातील साम्राज्य या आदिवासी पट्ट्यात उभारत आहे.
ज्या सट्टा मटका जुगारामुळे पौराणिक काळात पांडवाना आपले सर्वस्व जुगारात हरावे लागले होते,अगदी त्याच पध्दतीने दाऊद या आदिवासी पट्ट्यातील आदिवासी बांधवाना जुगाराचे नादी लावून कंगाल बनविण्याचा भयानक डाव खेळत आहे.स्वतः खुशहाल आणि पोलिस , व तथाकथित पत्रकारांना थातूरमातूर चिरीमिरी देऊन सट्ट्यच्या रग्गड कमाईतून मालामाल मात्र होत आहे शिवाय त्यासोबतच महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी वस्तीगृहात शिक्षणासाठी असलेल्या विद्यार्थ्यांचे भविष्य देखील या सट्टा माफीयाच्या अवैध व्यवसायामुळे उध्वस्त होण्याची वेळ येऊन ठेपली आहे.कळवण विभागाचे आदिवासी प्रकल्पधिकारी विकास मीना साहेब तरी निदान या वस्तीगृह परिसरात चालणारा हा अवैध व्यवसाय मोडीत काढतील का?असा प्रश्न आता निर्माण होत आहे.वास्तविक डांगसौंदाणे हे मध्यवर्ती बाजारपेठेचे गाव असून,या ठिकाणी स्वतंत्र औट पोलिस स्टेशन असूनदेखील दाऊदच्या या अवैध व्यवसायाची स्थानिक पोलिसांना माहिती असू नये म्हणजे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.त्याशिवाय प्रत्येक गोष्टीत जागरुकता दाखविणारे तथाकथित पत्रकारही या अवैध व्यवसायाबाबत नेमके का मौन बाळगून बसलेले आहेत हे देखील एक कोडेच आहे.निसर्गसंपन्न असलेल्या या परिसरातील भोळ्याभाबडया आदिवासी बांधवाना सट्टा मटका जुगाराच्या नादी लावून त्यांच्या सुखी संसाराची रांखरांगोळी करण्यापुर्वीच पोलिस प्रशासनाने दाऊदचे डांगसौंदाणेतील साम्राज्य उध्वस्त करावे, याप्रश्नी उद्या शुक्रवार दि.४ फेब्रुवारी रोजी मालेगांवचे अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांना राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघाच्या वतीने निवेदन देण्यात येऊन कठोर कारवाईची मागणी केली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here