Home आंतरराष्ट्रीय 🛑 आयपीएलपुढे पाकिस्तान सुपर लीगमधील बक्षिसाची रक्कम म्हणजे… अतिसामान्य !! 🛑

🛑 आयपीएलपुढे पाकिस्तान सुपर लीगमधील बक्षिसाची रक्कम म्हणजे… अतिसामान्य !! 🛑

181
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 आयपीएलपुढे पाकिस्तान सुपर लीगमधील बक्षिसाची रक्कम म्हणजे… अतिसामान्य !! 🛑
✍️ क्रिडा विषयक 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

क्रिडा:⭕पाकिस्तान सुपर लीगचा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात कराची किंग्सने लाहोर कलंदर्सला ५ विकेट्सने पराभूत करत पहिल्यांदाच पीएसएलचे विजेतेपद जिंकले. पीएसएलचा हा असा पहिला हंगाम होता, जो संपूर्णपणे पाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात आलेला. तसेच या स्पर्धेचे साखळी फेरीचे सामने मार्चमध्ये पार पडले होते. मात्र त्यानंतर कोरोना व्हायरसच्या संकटामुळे प्लेऑफचे सामने ८ महिन्यांनंतर पार पडले.
विशेष म्हणजे इंडियन प्रीमीयर लीग २०२० आणि पीएसएल २०२० या दोन्ही स्पर्धांचे अंतिम सामने ७ दिवसांच्या अंतराने पार पडले. त्यामुळे या दोन स्पर्धांमध्ये तुलना झालेली पाहायला मिळाली. या दोन्ही स्पर्धांच्या बक्षीस रक्कमेतही बरीच तफावत आहे. या बाबत या लेखात आपण जाणून घेऊ.

पीएसएल विजेत्यापेक्षा आयपीएल विजेत्या संघाला मिळाली ५ पटीने अधिक रक्कमआयपीएलला जगभरातून मिळत असलेल्या प्रतिसादामुळे त्यांना अनेक मोठे प्रायोजकही मिळतात. त्याचमुळे त्यांच्या आणि इतर स्पर्धांच्या बक्षीस रक्कमेतही मोठी तफावत पाहायला मिळते. पीएसएलबाबतही वेगळे काही नाही.

युएईमध्ये पार पडलेल्या यंदाच्या आयपीएल हंगामाचे विजेतेपद मुंबई इंडियन्सने अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करत मिळवले. या विजेतेपदानंतर मुंबईला  भारतीय चलनानुसार २० कोटी रुपये बक्षीस मिळाले. तर उपविजेत्या दिल्लीला १२.५ कोटी रुपये बक्षीस मिळाले. दुसरीकडे पीएसएलच्या या हंगामातील विजेत्या कराची संघाला भारतीय चलनानुसार ३.७५ कोटी रुपये तर उपविजेत्या लाहोर कलंदर्सला १.५ कोटी रुपये बक्षीस म्हणून मिळाले. म्हणजेच पीएसएल विजेत्यापेक्षा जवळपास ५ पटीने अधिक रक्कम आयपीएल विजेत्या संघाला मिळाली.
याबरोबर आयपीएलमध्ये प्लेऑफमध्ये पोहचणाऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या संघांनाही बक्षीस रक्कम दिली जाते. त्यामुळे यंदा अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर राहिलेल्या सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या संघांना प्रत्येकी ८.७५ कोटी रुपये मिळाले. दुसरीकडे पीएसएल तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या संघाला कोणतीही बक्षीस रक्कम देत नाही.

दोन्ही स्पर्धांमध्ये संघांना मिळालेली बक्षीस रक्कम पाहाता आयपीएलच्या तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरील संघापेक्षाही पीएसएलच्या विजेत्या संघाला जवळपास अडीचपट कमी बक्षीस रक्कम मिळाली आहे.⭕

Previous articleकौळाणे(निं.) आणि व-हाणे पत्रकार भवन जागा प्रश्नाचे नेमके राजकीय गौडबंगाल काय?* *चौकशी अधिकाऱ्यांनीच का घेतली माघार*
Next article🛑 पुणे शहरात दुसर्‍या लाटेची सुरवात 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here