Home अमरावती स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यानंतर ही पंडित जवाहरलाल नेहरु यांचे देशाकरता महान कार्य

स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यानंतर ही पंडित जवाहरलाल नेहरु यांचे देशाकरता महान कार्य

111
0

आशाताई बच्छाव

IMG_20231115_070137.jpg

स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यानंतर ही पंडित जवाहरलाल नेहरु यांचे देशाकरता महान कार्य

काँग्रेस जिल्हाध्यक्ष बबलूभाऊ देशमुख यांचे प्रतिपादन

काँग्रेस भवन येथे पंडित जवाहरलाल नेहरू जयंती साजरी

मयुर खापरे चादुंर बाजार

अमरावती येथे पंडित जवाहरलाल नेहरु यांचा स्वातंत्र्यलढ्यात सक्रीय सहभाग होता. महात्मा गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली नेहरूंजीनी विविध आंदोलनातही सहभाग घेतला. नेहरु यांना स्वातंत्र्यलढ्यात ११ वर्ष तरुंगवासही भोगावा लागला. देश स्वतंत्र्य झाल्यानंतर पहिले पंतप्रधान होण्याचा मान त्यांना मिळाला पण त्यावेळी भारताची आर्थिक स्थिती अतिशय हलाखिची होती. स्वातंत्र्यानंतर पंडित नेहरु यांनी लोकशाही व्यवस्था स्विकारली हे त्यांचे सर्वात मोठे योगदान आहे. पंडित जवाहरलाल नेहरु यांनी जागतिक पातळीवर भारताची स्वतंत्र ओळख निर्माण केली. अमेरिका किंवा रशिया यापैकी कोणत्याच गटात सहभागी न होता भारताचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले. असे प्रतिपादन जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलूभाऊ देशमुख यांनी केले

काँग्रेस भवन नेते माजी पंतप्रधान स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते ,यावेळी अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष बबलूभाऊ देशमुख तर प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार बळवंतराव वानखडे यांची होती, उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फोटोचे पूजन व हार अर्पण केले, यावेळी अध्यक्ष भाषणात बबलूभाऊ देशमुख म्हणाले ,स्वतंत्र भारताच्या परराष्ट्र धोरणाला नेहरुजी यांनी अतिशय योग्य आकार दिला. पंडित नेहरूंनी सार्वजनिक उद्योगांची मोठी साखळी निर्माण केली. विज्ञान व तंत्रज्ञानावर भर दिला आणि अणुशक्तीची पायाभरणी केली. बोकारो, भिलई, दुर्गापूर, राऊरकेला हे पोलाद प्रकल्प उभे करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे आजच्या युवकांकरिता त्यांचे कार्य आणि विचार अत्यंत महत्त्वाचे असल्याचे जिल्हाध्यक्ष बबलुभाऊ देशमुख म्हणाले ,या कार्यक्रमाला
आमदार बळवंतराव वानखडे,हरिभाऊ मोहोड,प्रकाशराव काळबांडे,जयंतराव देशमुख,संजयभाऊ मार्डीकर,प्रदीपभाऊ देशमुख,भैय्यासाहेब मेटकर,हेमंतराव येवले,समाधानराव दहातोंडे,भागवतराव खांडे, बिट्टूभाऊ मंगरुळे,विनायकराव ठाकरे,सिद्धार्थ बोबडे,पंकज मोरे,भैय्यासाहेब वानखडे,शेखर दाभणे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here