• Home
  • मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

🛑 गुळाची चविष्ट खीर 🛑

मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )
✍️ पाककला रेसिपी

मुंबई, 28 ऑगस्ट : ⭕

➡️ महत्त्वाची सामग्री :-

(Serving: 2)

– 4 कप दूध
– 1 चमचे तूप
– 1/4 कप गुळाची पावडर
– 2 चमचे तांदूळ
– आवश्यकतेनुसार हिरवी वेलची.

➡️ सजावटीसाठी :-

– आवश्यकतेनुसार काजू
– आवश्यकतेनुसार मनुका

➡️ कसे बनवावे गुळाची चविष्ट खीर :-

Step 1: दूध उकळत ठेवा
एका पॅनमध्ये पाणी उकळत ठेवा. पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये चार कप दूध मिक्स करा. दूध थोडेसे घट्ट होईलपर्यंत ढवळत राहा.

Step 2: दुधामध्ये वेलची पूड मिक्स करा
दूध घट्ट झाल्यावर त्यामध्ये वेलची पावडर आणि दोन चमचे भिजवलेले तांदुळ मिक्स करा. दूध ढवळत राहा म्हणजे ते पॅनला चिकटणार नाही. यानंतर गॅस बंद करा आणि मिश्रण थंड होण्यास ठेवून द्या.

Step 3: काजू, मनुके फ्राय करा
आता दुसऱ्या पॅनमध्ये एक चमचा तूप गरम करा. त्यामध्ये काजू आणि मनुके फ्राय करून घ्या. फ्राय केलेले काजू आणि मनुका वेगळे ठेवा.

Step 4: तुपामध्ये गूळ परतवून घ्या
आता याच पॅनचमध्ये तुपामध्ये गूळ पावडर परतवून घ्या. त्यामध्ये थोडेसे पाणी घाला. गूळ पूर्णपणे विरघळेपर्यंत ढवळत राहा.

Step 5: गुळाचा पाक आणि दूध एकत्र करा
आता दुधामध्ये काजू आणि मनुक्यांचा समावेश करा आणि सामग्री नीट मिक्स करून घ्या. थोड्या वेळाने यात गुळाचा पाकही मिक्स करा.

Step 6: तयार झाली आहे गुळाची खीर
खीर तयार झाल्यानंतर गॅस बंद करा. एका बाउलमध्ये खीर सर्व्ह करा आणि सजावटीसाठी सुकामेव्याचा वापर करा.

Step 7: गुळाची खीर : संपूर्ण पाककृती या व्हिडीओमध्ये पाहा
टीप : खीर तयार करण्यासाठी सेंद्रिय गूळ पावडरचाच वापर करावा.⭕

anews Banner

Leave A Comment