• Home
  • 🛑 लोकल सुरु करण्यासाठी आम्ही तयार पण…🛑

🛑 लोकल सुरु करण्यासाठी आम्ही तयार पण…🛑

🛑 लोकल सुरु करण्यासाठी आम्ही तयार पण…🛑

मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 28 ऑगस्ट : ⭕ मुंबईत लोकल वाहतूक सुरू करण्यासाठी तयार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे डीआरएम शलभ गोयल यांनी दिलीय. पण त्यासाठी राज्य सरकारने हिरवा कंदिल दिला पाहिजे. मुंबईची लाईफलाईन म्हणजे मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा. याच रेल्वेतून लाखो नागरिक प्रवास करायचे. मात्र कोरोनामुळे मुंबईतील रेल्वे सेवा केवळ अत्यावश्यक सेवेतील नागरिकांसाठी सुरू आहे.

मध्य रेल्वेचे डीएमआर गोयल म्हणाले आहेत, उपनगरील मध्य रेल्वे लोकल सेवा सुरु करण्याबाबत आम्ही राज्य सरकारवर अवलंबून आहोत. ‘राज्य सरकारने मागणी केल्यास लोकल त्वरित सुरु करू’. मुंबईतील मध्य रेल्वे लोकल सुरु करण्यास आम्ही कधीही तयार असल्याचंही गोयल म्हणालेत. या बरोबरच कोरोनाच्या संवेदनशील परिस्थितीत रेल्वेवरील गर्दीचा भार कमी करण्यासाठी कार्यलयीन वेळेत बदल करण्याची मागणीही मध्य रेल्वेकडून केली जात असल्याचं समजतय आहे.⭕

anews Banner

Leave A Comment