• Home
  • 🛑 फक्त ८,९९९ रुपयात लाँच झाला रेडमी-९ , ….! सुंदर लुकसह ५०००mAh बँटरी…! जाणून घ्या 🛑

🛑 फक्त ८,९९९ रुपयात लाँच झाला रेडमी-९ , ….! सुंदर लुकसह ५०००mAh बँटरी…! जाणून घ्या 🛑

🛑 फक्त ८,९९९ रुपयात लाँच झाला रेडमी-९ , ….! सुंदर लुकसह ५०००mAh बँटरी…! जाणून घ्या 🛑
✍️ मुंबई 🙁 साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई ⭕- शाओमीने आपला नवीन स्वस्त फोन रेडमी 9 भारतात लॉन्च केला आहे. चांगली गोष्ट म्हणजे या स्वस्त फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे. तरीही कंपनीने या फोनची किंमत बर्‍यापैकी कमी ठेवली आहे.

शाओमीने रेडमी 9 ला ८,९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीवर लाँच केले आहे. फोनचा पहिला सेल ३१ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता ठेवला जाईल.

या फोनच्या 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेजची किंमत 8,999 रुपये आहे आणि 4 जीबी + 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ९,९९९ रुपये आहे.

फोनमध्ये 6.53 इंचाचा एचडी+ IPS डिस्प्ले आहे. असे सांगितले गेले की, हा ईमेर्सिव्ह स्क्रीनसह आहे, जे करमणुकीचा अधिक चांगला अनुभव देते.

फोनला हाय परफॉरमन्स Helio G35 ऑक्टा कोर प्रोसेसर (2.3Ghz) आहे. फोनमध्ये 4 जीबी रॅम+64 जीबी आणि 4 जीबी+128 जीबी स्टोरेज आहे. या फोनला एफिशियंट मल्टी टास्किंग फोन म्हटले गेले आहे.

फोन एरोरा एज डिझाइनसह सादर करण्यात आला आहे. ग्राहक हा फोन Sporty Orange, Carbon Black आणि Sky Blue या तीन रंगात खरेदी करू शकतात.

हा कंपनीचा पहिला फोन आहे, जो अँड्रॉइड 10 आधारित MIUI 12 सह लाँच झाला आहे. रेडमी 9 मध्ये ड्युअल रीअर AI कॅमेरा देण्यात आला आहे. यात f/2.2, FF सह 13 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि f/2.2 सह 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला गेला आहे. याशिवाय एलईडी फ्लॅशही आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 5 मेगापिक्सलचा AI कॅमेरा देखील आहे. या फोनमध्ये AI फेस अनलॉकसारखे फिचर देखील देण्यात आले आहे. तसेच कॅमेऱ्यासह आर्टिफिशियल इंटेलिजन्सचाही सपोर्ट आहे.

रेडमी 9 मध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे, त्यासह कंपनीने ३० तासांच्या व्हिडिओ प्लेबॅकचा दावा केला आहे. याशिवाय फोनमध्ये 4जी, वाय-फाय, व्हीओ वाय-फाय, जीपीएस आणि 3.5 एमएमचा हेडफोन जॅक देण्यात आला आहे….⭕

anews Banner

Leave A Comment