Home Breaking News 🛑 ‘या’ गोष्टींमध्ये होणार १ सप्टेंबरपासून बदल, सिलेंडर, विमान सेवा, जीएसटीसह.🛑

🛑 ‘या’ गोष्टींमध्ये होणार १ सप्टेंबरपासून बदल, सिलेंडर, विमान सेवा, जीएसटीसह.🛑

83
0

🛑 ‘या’ गोष्टींमध्ये होणार १ सप्टेंबरपासून बदल, सिलेंडर, विमान सेवा, जीएसटीसह.🛑

  • मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 28 ऑगस्ट : ⭕ देशात १ सप्टेंबरपासून काही महत्त्वपूर्ण बदल अंमलात येणार आहेत. हे बदल दैनंदिन जीवनापासून ते वित्त संबंधित आहेत. या बदलांमध्ये अनलॉक ४ च्या नियमांचा देखील समावेश आहे. याशिवाय ऑगस्ट महिन्यात सरकारने काही नवीन तरतुदी जाहीर केल्या, ज्या १ सप्टेंबरपासून लागू होणार आहेत. चला पुढच्या महिन्यापासून काय बदलणार आहे ते जाणून घेऊया.

➡️ एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत होणार वाढ :-

दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी सिलेंडरची किंमत बदलते. १ ऑगस्ट रोजी फक्त कोलकाता येथे एलपीजीचे दर बदलले होते. विना अनुदानित एलपीजी सिलेंडरची किंमत ६२१ रुपये एवढी झाली होती. त्याच वेळी, १४ किलो एलपीजी सिलिंडरची किंमत दिल्लीत ५९४ रुपये, मुंबईत ५९४ रुपये आणि चेन्नईमध्ये ६१०.५० रुपयांवर स्थिर राहिली.

➡️ विमान प्रवास होणार महाग :-

नागरी उड्डाण मंत्रालयाने १ सप्टेंबरपासून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान प्रवाशांकडून अधिक विमान वाहतूक सुरक्षा शुल्क (एएसएफ) आकारण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे हवाई प्रवास अधिक महाग होईल. पुढील महिन्यापासून घरगुती हवाई प्रवाशांना एएसएफ म्हणून १५० रुपयांऐवजी १६० रुपये द्यावे लागतील. त्याच वेळी, आंतरराष्ट्रीय प्रवाशांना ४ सप्टेंबरपासून एएसएफ म्हणून ५.२ डॉलर्स द्यावे लागतील. एअरलाइन्स तिकीट बुकिंगच्या वेळी एएसएफ गोळा करतात आणि ते सरकारकडे जमा करतात. ही रक्कम देशभरातील विमानतळांच्या सुरक्षा व्यवस्थेत वापरली जाते.

➡️ जीएसटी देयकामध्ये विलंब, संपूर्ण कर देयकावर व्याज आकारणार :-

वस्तू व सेवा कर (जीएसटी) भरण्यास उशीर झाल्यास १ सप्टेंबरपासून एकूण कर देयकावर व्याज आकारले जाईल, असे सरकारने म्हटले आहे.

➡️ कर्ज स्थगितीचा ( Loan Moratorium) अवधी संपणार :-

आरबीआयने जाहीर केलेली कर्ज स्थगिती ३१ ऑगस्ट रोजी संपणार आहे. लॉकडाऊनमध्ये पैसे नसल्यामुळे कर्जदारांना दिलासा मिळावा यासाठी आरबीआयने कर्ज स्थगिती जाहीर केली. पूर्वी तीन महिने होती, नंतर ती आणखी तीन महिने वाढविण्यात आली. म्हणजेच, आता ६ महिन्यांच्या कर्ज स्थगितीची सवलत ३१ ऑगस्ट रोजी संपत आहे.

➡️ अनलॉक ४ :-

१ सप्टेंबरपासून देशात अनलॉक ४ सुरू होणार आहे. अनलॉक ४ मध्ये काय उघडले जाईल आणि काय नाही याबाबत गृह मंत्रालयाने अद्याप मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या नाहीत. गृह मंत्रालयाच्या आधारावर राज्य सरकार स्वत: हून मार्गदर्शक तत्त्वेही जारी करतील. अनलॉक ४ मध्ये मेट्रो सेवा पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.⭕

Previous article  नामपूरहून दोधेश्वर येथे जातांना कोळीपाडा येथील दोध्याड नदीवरील फरशी पुल दुर्दशा
Next article🛑 फक्त ८,९९९ रुपयात लाँच झाला रेडमी-९ , ….! सुंदर लुकसह ५०००mAh बँटरी…! जाणून घ्या 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here