Home Breaking News   नामपूरहून दोधेश्वर येथे जातांना कोळीपाडा येथील दोध्याड नदीवरील फरशी पुल दुर्दशा

  नामपूरहून दोधेश्वर येथे जातांना कोळीपाडा येथील दोध्याड नदीवरील फरशी पुल दुर्दशा

132
0

नामपूरहून दोधेश्वर येथे जातांना कोळीपाडा येथील दोध्याड नदीवरील फरशी पुल दुर्दशा👆    सटाणा,(जगदिश बधान तालुका ग्रामीण प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)- कोळीपाडा हे बागलाण तालुक्यातील नामपुर पंचक्रोशीतील आदिवासी लोकवस्तीचे गाव आहे. नामपूरहून दोधेश्वर येथे जाताना कोळीपाडा गावालगत असलेला फरशी पुल मागच्या वर्षी पावसाने भगदाड पडून वाहून गेला. दोध्याड नदीवरील या पुलाला स्थानिक भाषेत’ कुंडाचा फरशी पुल’म्हणतात.पुलाच्या वरील बाजुस म्हसोबा मंदिर व पाण्याचे कुंड आहे.आज एक वर्ष होऊनही त्या पुलाची कोणतीही दुरुस्ती झालेली नाही. कोळीपाडा ग्रामस्थांना नामपुर येथे बाजारपेठ असल्याने दररोज जावे लागते.दवाखाना,कृषी उत्पन्न बाजार समिती येथे येजा सुरू असते.या रस्त्याने शेतमाल वाहनाने घेऊन जाणे अवघड असते. कोरोनाने या वर्षी दोधेश्वर येथील शिवमंदिर बंद असले तरी पर्यटकांना या रस्त्याने दुचाकी, चारचाकी वाहन घेऊन जातांना कसरत करावी लागते.भविष्यातील गर्दीचा रस्ता आहे.सध्या शिवमंदिर बंद असले तरी या मार्गाने अनेक पर्यटक कोळीपाडा, दोधेश्वर येथील डोंगर परिसरातील निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी येतात.नामपुर-दोधेश्वर रस्त्यावर खड्डे पडले असून या पुलाचे काम व्हावे यासाठी ग्रामस्थ सातत्याने मागणी करत आहेत. वारंवार मागणी करूनही लोकप्रतिनिधी आमदार,खासदार यांनी या रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष केले आहे. या रस्त्याचे व फरशी पुलाचे लवकरात लवकर काम सुरू करावे अशी मागणी कोळीपाडा ग्रामस्थ व परिसरातील सामाजिक कार्यकर्ते महादू गातवे, चिंतामण गातवे,खंडू गातवे,भारत गातवे,विष्णू गातवे,राजु गुमाडे, अनिल गातवे,बंडू गातवे,शरद गातवे,विष्णू गुमाडे,गोरख गातवे,बन्सीलाल जाधव,विठ्ठल गातवे,रतन जाधव,अशोक गातवे,जिभाऊ गातवे,भुषण गातवे,वाळू गातवे यांनी केली आहे.

Previous articleविनायक मेटेच्या नसत्या उठाठेवींनी मराठा आरक्षणावर बालंट , काँग्रेसचा गंभीर आरोप
Next article🛑 ‘या’ गोष्टींमध्ये होणार १ सप्टेंबरपासून बदल, सिलेंडर, विमान सेवा, जीएसटीसह.🛑
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here