Home भंडारा मॅनेजमेंट कोट्याचे प्रशिक्षण शुल्क कमी करा याकरिता ऑल इंडिया स्टुडन्ट फेडरेशनच्या वतीने...

मॅनेजमेंट कोट्याचे प्रशिक्षण शुल्क कमी करा याकरिता ऑल इंडिया स्टुडन्ट फेडरेशनच्या वतीने प्राचार्य निंबार्ते यांना निवेदन

16
0

Yuva maratha news

1000315190.jpg

मॅनेजमेंट कोट्याचे प्रशिक्षण शुल्क कमी करा याकरिता

ऑल इंडिया स्टुडन्ट फेडरेशनच्या वतीने प्राचार्य निंबार्ते यांना निवेदन

 

संजीव भांबोरे
भंडारा,( जिल्हा प्रतिनिधी) ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन च्या वतीने मॅनेजमेंट कोट्याचे प्रशिक्षण शुल्क कमी करून प्रशिक्षणार्थींच्या इतर समस्या सोडविण्यासाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तुमसर च्या प्राचार्या श्रीमती निंबार्ते मॅडम यांना देण्यात आले.यावेळी मॅनेजमेंट कमिटी व वरिष्ठांशी चर्चा करून लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन प्रचार्यांच्या वतीने देण्यात आले.
तुमसर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत IMC (इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट कमिटी) कोट्या अंतर्गत घेण्यात येणाऱ्या प्रवेशासाठी फिटर-६०,०००/-, इलेक्ट्रीशियन-५०,०००/-,इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक-३०,०००/-,वेल्डर-२०,०००/-,COPA-२०,०००/- अशा पद्धतीने अवाढव्य शुल्क आकारण्यात येत असून गरीब विद्यार्थ्यांना प्रशिक्षणापासून वंचित ठेवण्यात येत आहे. याउलट खाजगी संस्थामध्ये यापेक्षा अर्ध्या शुल्कात प्रवेश दिला जातो तेव्हा विद्यार्थी कमी शुल्क असलेल्या खाजगी संस्थेत जातील की,अवाढव्य शुल्क आकारणाऱ्या शासकीय संस्थेत हा प्रश्नच आहे. यावरून सदर संस्था गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे काम करीत आहे तसेच येथील काही कर्मचारी आपले काम नियमित व प्रामाणिकपणे करीत नाही यामुळे येथील विद्यार्थ्यांना शासनाद्वारे देण्यात येणाऱ्या “प्रशिक्षण प्रतिपूर्ती योजनेचा” लाभ संस्थेतील कोणत्याही विद्यार्थ्याला मिळाला नाही, वरिष्ठांच्या दुर्लक्ष केल्याने व कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य बाजावण्यास कसूर करून सदर योजनेपासून विद्यार्थ्यांना वंचित ठेवण्यात आले आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षणार्थ्यांना 550 रुपये अनामत रक्कम दिल्या जाते ती रक्कम 2020 नंतर एकाही प्रशिक्षनार्थींना दिली गेली नाही.त्या विद्यार्थ्यांच्या पैशावर संस्थेतील कारभाऱ्यांनी डल्ला मारण्याचा काम केला आहे .तरी हे विद्यार्थ्यांवरील अन्याय ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन सहन करणार नाही असा इशारा जिल्हा उपाध्यक्ष कॉम्रेड रवी बावणे यांनी दिला आहे.
विद्यार्थी हित लक्षात घेता ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन च्या वतीने काही मागण्या करण्यात आल्या यामध्ये- संस्थेमार्फत चालणाऱ्या सर्व अभ्यासक्रमांची शुल्क सध्या आकारत असलेल्या शुल्काच्या अर्धी शुल्क आकारण्यात यावी, “प्रशिक्षण प्रतिपूर्ती योजनेचा” लाभ संस्थेतील सर्व प्रशिक्षणार्थींना मिळेल यासाठी तातडीने प्रयत्न करण्यात यावे व आपले कर्तव्य बजावण्यास कसूर करून सदर योजनेपासून विद्यार्थ्यांना वंचित ठेवनाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात यावी,प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षणार्थ्यांना 550 रुपये अनामत रक्कम दिल्या जाते ती रक्कम त्या सर्व प्रशिक्षणार्थींना परत करण्यात यावी,प्रशिक्षणार्थींचे नियमितपणे वर्ग घेण्यात यावे,कर्मचारी व शिल्पनीदेशक वेळेवर येत नाहीत त्यांना वेळेवर येण्याचे निर्देश देण्यात यावे.इत्यादी चा समावेश आहे. तरी मागण्यांना गांभीर्याने घेऊन त्या त्वरित पूर्ण झाल्या नाही तर AISF प्रशासनाविरुद्ध आंदोलनात्मक कारवाई करण्यास ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन ला बाध्य व्हावे लागेल याला संस्था जबाबदार राहील असा इशारा ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन च्या वतीने देण्यात आला. यावेळी शिष्टमंडळात जिल्हा उपाध्यक्ष कॉम्रेड रवी बावणे, कॉ.प्रणय बडवाईक, कॉ.विश्वजित बनकर उपस्थित होते.

Previous articleशरद पवारांची राहुरीत प्रचारसभा संपन्न
Next articleसंस्कार शिबिर म्हणजे राष्ट्र निर्मितीची संकल्पना – देवचंद चौधरी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here