• Home
  • कोव्हिड पॉझेटिवची वाढती संख्या चिंतेची बाब – लॉकडाउन वाढवायचे अधिकार स्थानिक प्रशासनाला ;

कोव्हिड पॉझेटिवची वाढती संख्या चिंतेची बाब – लॉकडाउन वाढवायचे अधिकार स्थानिक प्रशासनाला ;

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210219-WA0145.jpg

कोव्हिड पॉझेटिवची वाढती संख्या चिंतेची बाब – लॉकडाउन वाढवायचे अधिकार स्थानिक प्रशासनाला ;
उपमुख्यमंत्री अजित पवार

दि.१९ – राजेश एन भांगे/युवा मराठा न्युज नेटवर्क

राज्यात पुन्हा एकदा कोरोना व्हायरस डोकं वर काढत असून अनेक ठिकाणी लॉकडाउन करण्यासंबंधी राज्य सरकार विचार करत आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डिस्चार्ज मिळणाऱ्यांच्या तुलनेत करोनाबाधित रुग्णांची संख्या जास्त असणं चिंतेची बाब असल्याचं म्हटलं आहे.
यावेळी त्यांनी स्थानिक प्रशासनाला लॉकडाउनची मुभा देण्यात आल्याचं स्पष्ट केलं आहे.
शिवजंयती निमित्त शिवनेरी गडावर अजित पवारांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
“करोनावर सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांची रविवारी बैठक होणार आहे.
करोनाला कसं रोखता येईल याचा निर्णय बैठकीत घेतला जाईल.
मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या सर्व अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली त्यात स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
सुरुवातीच्या काळात पॉझिटिव्हची संख्या जे डिस्चार्ज व्हायचे त्यांच्यापेक्षा कमी होती.
पण १ फेब्रुवारीपासून काही शहरं, जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हची संख्या डिस्चार्जच्या तुलनेत वाढत असून ते धोक्याचं आणि काळजीचं आहे,” असं अजित पवार म्हणाले आहेत.

“काल आमची कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. या बैठकीत आम्ही १ मार्चपासून अर्थसंकल्प अधिवेशचा कार्यक्रम आखला आहे.
साधारण तीन चार आठवड्याचा कार्यक्रम दिला.
पण त्याबद्दल पुन्हा गुरुवारी चर्चा होणार आहे,” अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “काही बाबतीच तेथील प्रशासनाला गरज वाटत असेल तर लॉकडाउन करा अशी मुभा दिली आहे.

संध्याकाळी ६ ते सकाळी ६ असं करायचं असेल तर तसं करा.
पण बाकीच्या टीमला कोणी मास्क वापरत नसेल तर कठोर कारवाई झाली पाहिजे असं सांगितलं आहे.

anews Banner

Leave A Comment