Home नांदेड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंद्री (प.दे.)व ग्रामपंचायत कार्यालय उंद्री (प.दे.) ता. मुखेड...

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंद्री (प.दे.)व ग्रामपंचायत कार्यालय उंद्री (प.दे.) ता. मुखेड येथे शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न..

242

राजेंद्र पाटील राऊत

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंद्री (प.दे.)व ग्रामपंचायत कार्यालय उंद्री (प.दे.) ता. मुखेड येथे शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न..
मनोज बिरादार मुखेड तालुका प्रतिनिधी (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंद्री (प.दे.) व ग्रामपंचायत कार्यालय उंद्री (प.दे.) ता. मुखेड शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.सर्वप्रथम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंद्री (प.दे.) ता. मुखेड येथे शाळेचे शिक्षक श्री चव्हाण सर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. उंद्री प.दे. येथील ग्रामपंचायत कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच श्रीमती वनिता रमेश गनले वार व उपसरपंच सौ. रमाबाई संदीपराव सोनकांबळे यांच्या हस्ते पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. ग्रामपंचायत कार्यालय उंद्री प.दे. येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास राजू पाटील सूर्यवंशी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. Covid-19 च्या महामारी मुळे एकदम साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला .बारा बलुतेदार, आणि अठरा पगड जातींना आपल्या स्वराज्यात स्थान देऊन खर्‍या अर्थाने जाती निरपेक्ष धर्मनिरपेक्ष समाजव्यवस्था निर्माण करणारे निधर्मी राजेगुलामगिरी करू शकत नाही असे स्वराज्यनिर्माते अखंड महाराष्ट्राचे नव्हे तर साऱ्या विश्वाचे आराध्यदैवत रयतेचे राजे परस्त्रीला मातेसमान मानणारे राजाधिराज, क्षत्रियकुलावंत, प्रजाहित दक्ष, बहुजन प्रतिपालक, रयतेचे राजे, कुळवाडीभूषण,महाराजांच्या जयंती निमित्त मानाचा त्रिवार मुजरा .. जय जिजाऊ जय शिवराय यावेळी सुधाकर गनलेवार, गोपाळ पाटील बिरादार, अनिल पाटील वडजे, शिवाजी पंदनवाड ,राजू पाटील सूर्यवंशी, माधव पाटील पसारे, उमेश सोनकांबळे, हिरामण सोनकांबळे, रवींद्र पवार, आकाश पाटील वडजे, पत्रकार मनोज पाटील बिरादार, मारोती पाटील वडजे, नियाजअहमद शेख, यशवंत वडजे, दयानंद सोनकांबळे, मुकिंदा सोनकांबळे, शाहरुख शेख सूत्रसंचालन अनिल पाटील वडजे यांनी केले . यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक व नवतरुण बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleकोव्हिड पॉझेटिवची वाढती संख्या चिंतेची बाब – लॉकडाउन वाढवायचे अधिकार स्थानिक प्रशासनाला ;
Next articleशेळगाव (गौरी) येथे शिवजयंती उत्साहात साजरी..
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.