Home नाशिक कर्मवीर गणपत दादा मोरे यांना नांदुर्डी विद्यालयात अभिवादन

कर्मवीर गणपत दादा मोरे यांना नांदुर्डी विद्यालयात अभिवादन

89
0

आशाताई बच्छाव

IMG-20230921-WA0030.jpg

कर्मवीर गणपत दादा मोरे यांना नांदुर्डी विद्यालयात अभिवादन

रामभाऊ आवारे निफाड

जनता विद्यालय नांदुर्डी हायस्कूलमध्ये कर्मवीर गणपत दादा मोरे यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापक डावरे डी ए व विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्री शिंदे टी जी ,पगारे आर व्ही, पाटील आर एस ,हळदे संतोष, सुनील शिंदे, ज्ञानेश्वर खापरे हे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने करण्यात आली. कर्मवीर गणपत दादा मोरे यांच्या प्रतिमेचे पूजन व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक बंधू भगिनी तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.विद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकांनी कर्मवीर गणपत दादा मोरे यांच्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षीय मनोगतात विद्यालयाच्या मुख्याध्यापक श्री डावरे सर यांनी पिंपळगाव म्हणजे ऐतिहासिक वारसा व दळणवळणाचे प्रमुख केंद्र असल्याने अनेक चळवळी येथे झाल्या असल्या तरी कर्मवीर गणपतदादा मोरे यांच्या कार्यामुळे पिंपळगावची खरी ओळख संपूर्ण महाराष्ट्राला झाली. नाशिक जिल्ह्यातील बहुजन समाजाच्या विकासासाठी शिक्षणरुपी यज्ञात आपल्या आयुष्याची समीधा त्यांनी टाकली. परिस्थितीला न डगमगता स्वाभिमानी व बंडखोर प्रवृत्तीने अंधश्रद्धेच्या,अंधकारात चाचपडणाऱ्या समाजाला नवीन दिशा देण्याचे काम त्यांनी केले. सत्यशोधक समाज विचारांचा जलसा पाहून कर्मवीर गणपत दादा मोरे व त्यांचे कार्यकर्ते गावोगावी प्रयोग करून समाज जागृती चे फार मोठे कार्य करू लागले.अज्ञान व अंधश्रद्धेच्या जखडलेल्या समाजाला जागे करण्यासाठी कर्मवीर गणपत दादा मोरे यांनी आपले आयुष्य वेचले.तळागाळापर्यंत शिक्षणाची ज्योत पसरून अंधश्रद्धा,रुढींचा पगडा कमी व्हावा यासाठी सत्यशोधक समाजाचे काम जोमाने सुरू होते.ज्या समाजात आपण जन्माला येतो त्या समाजाचे आपण देणे लागतो हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून कर्मवीर गणपत दादा मोरे यांनी आपल्या प्रपंचाची तमा न बाळगता समाजकार्यासाठी स्वतःला झोकून दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील विज्ञान शिक्षक पगारे आर व्ही यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार पाटील आर एस यांनी मानले.

Previous articleशैक्षणिक जगतातील आधुनिक भगीरथ-डॉ कर्मवीर भाऊराव पाटील
Next articleघर का भेदी लंका ढाये”!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here