Home संपादकीय घर का भेदी लंका ढाये”!

घर का भेदी लंका ढाये”!

172
0

राजेंद्र पाटील राऊत

20230921_210608-BlendCollage.jpg

संपादकीय अग्रलेख…
“घर का भेदी लंका ढाये”!
वाचकहो,
आम्ही “युवा मराठा”ची स्थापना हि अत्यंत खडतर वाटचालीतून सुमारे वीस वर्षापूर्वी केली.”युवा मराठा” सुरु करताना कुठलाही गाजावाजा केला नाही,किंवा कुणाला पत्रकार म्हणून जोडण्यासाठी आपल्या विचारांशी प्रतारणा केली नाही.”एकला चलो रे या न्यायाने” युवा मराठासोबत निष्ठावान अवघे तीनच लोक सुरुवातीला असताना “युवा मराठा”ची हि सामाजिक चळवळ पुढे संपूर्ण महाराष्ट्रभर एक लोकचळवळ म्हणून निर्माण करण्यात मराठा समाजाचे कट्टर व निष्ठावंत शिवभक्त मा.विजय वसंतराव पवार,आणि श्रीमती आशाताई बच्छाव यांचे खंबीर मार्गदर्शन व मोलाचे पाठबळ लाभले.म्हणूनच “युवा मराठा”ने आपली हि लोकचळवळ नक्कीच एक दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात वाढविली नाही.तर त्यासाठी वीस वर्षाचा त्याग,मेहनत संघर्षाच्या हिकमतीवर “युवा मराठा”ची आज पताका निष्ठावान शिलेदारांमुळे डामडौलाने फडकत आहे.पत्रकारिता करताना आम्ही काही अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेलो नाहीत.तर,पत्रकारीतेचा वसा आणि वारसा जोपासण्यासाठी हे संपूर्ण आयुष्यच लेखनीधर्माला समर्पित केलेले आहे.पत्रकारितेची सुरुवात करताना वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षापासून सुरुवात केलेली कामगिरी महाराष्ट्रातील अनेक नामवंत वृतपत्रात पत्रकारीता केल्यानंतर खरे अर्थाने सामाजिक चळवळीला स्थान मिळावे.हा उदांत हेतू नजरेसमोर ठेऊन “युवा मराठा”ची स्थापना केली.युवा मराठा मोठा करण्यासाठी कधी लाचारी केली नाही.किंवा कुणाचे तळवे चाटले नाहीत.युवा मराठा हा महाराष्ट्रातल्या अठरा पगड जातीधर्मातल्या बारा बलुतेंदारांचा खरा आधारस्तंभ व्हावा.म्हणून सदैवच आम्ही प्रयत्नशील राहिलोत.आणि युवा मराठात पत्रकार म्हणून नेमणूक करताना आम्ही कधी त्या व्यक्तीचा जातीधर्म बघितला नाही.किंवा त्याला पत्रकारीतेचा अनुभव आहे किंवा नाही,हेसुध्दा बघितले नाही.येणाऱ्या प्रत्येकाला आम्ही पत्रकारीतेचे ज्ञान देण्याबरोबरच “जे जे आपणांशी ठावे,ते इतरांशी सांगावे शहाणे करुन सोडावे सकळ जन” या संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील उपदेशाप्रमाणे युवा मराठात आलेल्या प्रत्येकाला घडवत गेलो.ज्यांना कधी पत्रकार म्हणून साधी ओळखही नव्हती त्यांना युवा मराठाने मान सन्मान मिळवून दिला.प्रतिष्ठा मिळवून दिली.पोट भरायचे शिकविले.तीच “घर का भेदी लंका ढाये”सारखी कुटील कारस्थान करणारी भामटी हडवाळ युवा मराठाशी कधीच एकनिष्ठ व प्रामाणिक राहिली नाहीत.गद्दारी हि काही नवीन नाही.कुणीही उठतो कुठल्याही क्षेत्रात गद्दारी करतो,अशा गद्दारांची अवस्था भविष्यात कुठलीही राहत नाही,”धोबी का कुता ना घर का ना घाट का” अशी अवस्था कालातरांने होते.मात्र जन्मजातच ज्यांच्या रक्तात गद्दारी निपचलेली असते,ते तरी स्वाभिमानाचे गुणगाण कसे गातील.एका कुटूंबात असलेली चवचाल छिनाल अवदसा सुन जसे गावभर सुसंस्कृत व खानदानी कुटूंबाचे खोबरे वाटत फिरते,अगदी तसेच “युवा मराठा”तही काही भामटे आम्ही त्यांना नको तेवढे प्रमाणापेक्षा अधिक महत्त्व दिल्याने स्वतः ला पत्रकारितेच्या दुनियेतले बेताज बादशहा समजायला लागलेत.ज्यांच्या बाबतीत आम्हांला अनेकांनी अगोदरच विरोध केला होता की,अशा लोकांना सोबत ठेऊच नका! मात्र “युवा मराठा” म्हणजे सत्यासाठी लढणारा,सत्यासाठी भांडणारा “युवा मराठा”परिवारातल्या प्रत्येक कौटुंबिक सदस्याचे सुख – दुःख आपलेच समजून त्यातून मार्ग काढणारा एकमेव परिवार असून,प्रसंगी “युवा मराठा”तील सदस्यांच्या न्याय अन्यायाच्या प्रकरणात रस्त्यावर उतरुन संघर्षाची धमक ठेऊन फक्त सत्याच्या वाटेवरील एक पाऊल तुमच्यासाठी! हा ध्यास सर्वसामान्यांसोबतच पत्रकार बंधूसाठी असणारा परिवार म्हणजे “युवा मराठा”मात्र छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात वेळोवेळी झालेल्या गद्दारांच्या कुटील कारवाया “स्वराज्य” स्थापने वेळीही चव्हाटयावर आलेल्या आहेत.मात्र महाराजांचे मावळे निष्ठावान व प्रामाणिक असल्यामुळेच जीवाची बाजी लावणारेही महाराजांसोबत होते.अगदी त्याच पध्दतीने आजही “युवा मराठा”साठी जीव ओवाळून टाकणारे निष्ठावान पत्रकार रुपातील मावळे युवा मराठाची खरी दौलत आहेत.हे गर्दभ पुराण कितीही वाढविले,तरी त्याचे मर्म गद्दारीचा टिळा माथी घेऊन हिंडणा-या गर्दभाना थोडाच कळणार आहे! “युवा मराठा”ने आपले कार्य वाढविण्यासाठी कधीच कुणाचा हेवा केला नाही,अथवा दुसऱ्यांना फोडून मोठे होण्याचे पाप केले नाही.याचा आम्हाला सदैव स्वाभिमानच आहे.एव्हढेच!

Previous articleकर्मवीर गणपत दादा मोरे यांना नांदुर्डी विद्यालयात अभिवादन
Next articleकाकनवाडा खुर्द च्या सरपंचांनी बळकावला गोठा शासनाचा झाला आर्थिक तोटा”
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here