Home पुणे जगतगुरू संतशिरोमणी संत तुकाराम महाराज जीवनगौरव पुरस्कार-2022 सोहळा मंत्रमुग्ध वातावरणात संपन्न

जगतगुरू संतशिरोमणी संत तुकाराम महाराज जीवनगौरव पुरस्कार-2022 सोहळा मंत्रमुग्ध वातावरणात संपन्न

41
0

आशाताई बच्छाव

IMG-20220624-WA0003.jpg

जगतगुरू संतशिरोमणी संत तुकाराम महाराज जीवनगौरव पुरस्कार-2022 सोहळा मंत्रमुग्ध वातावरणात संपन्न
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी उमेश पाटील
जगतगुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीने देहूतून पंढरपूर कडे प्रस्थान ठेवल्यावर आज नामदेव तुकाराम गजरात,टाळ मृदुंगाच्या तालात आणि सोबतच पावसाने लावलेल्या आल्हाददायक हजेरीत पुण्याचे प्रवेशद्वारावर बोपोडी येथे
मा.उपमहापौर सौ.सुनिता परशुराम वाडेकर आणि विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले.यावेळी परिसरातील महिला भगिनींनी उपमहापौर सुनिताताई वाडेकर यांच्यासोबत फुगडीचा ठेका धरुन दोन वर्षे कोरोना संकटाचा सामना करुन यंदा नव्या जोमाने पालखी सोहळा साजरा केला.
दरम्यान डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती पुणे आयोजित दर वारीदरम्यान दिला जाणारा जगतगुरु संत तुकाराम महाराज जीवनगौरव पुरस्कार २०२२ समाजातील विविध मान्यवरांना
संत तुकाराम महाराज संस्थान देहू चे अध्यक्ष ह.भ.प.श्री.नितीन महाराज मोरे यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.हा पुरस्कार खडकी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक श्री.दत्तात्रय चव्हाण, विठ्ठल रुक्मिणी देवस्थान बोपोडीचे अध्यक्ष ह.भ.प.श्री.निवृत्ती बहिरट,ज्येष्ठ संवादीनी वादक मास्तर श्री.विजय पवार, युवा भजन गायक श्री.गणेश चोरघे यांना
उपमहापौर सौ.सुनिता परशुराम वाडेकर,
रिपाईं नेते परशुराम वाडेकर
रिपाई शहराध्यक्ष मा.शैलेंद्र चव्हाण
यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
यावेळी शिवाजीनगर अध्यक्ष अविनाश कदम,भिमराव वाघमारे,जोयल अँथोनी आण्णा आठवले,अविनाश कांबळे महादेव साळवे,भीमा गायकवाड,प्रविण गायकवाड निलेश वाघमारे राजेंद्र शिंदे,बाळु मोरे,अनेश रोकडे,रुपेश पिल्ले,संजय गजरमल,रमेश खरात, बाळू मोरे रिकेश पिल्ले,समीर मनियार,सादीकभाई शेख, नौशाद सौदागर,नंदा निकाळजे,सुप्रियाताई निकाळजे डॉ.सममिंदर घोकशे व तसेच अनेक मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते वारकरी संप्रदायातील आदी मान्यवर,वारकरी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश जावीर यांनी केले तर छायाचित्रण ज्येष्ठ छायाचित्रकार विजय सोनिगरा यांनी केले.

Previous articleयोग साधना माणसाला आनंदी राहण्याचे बळ देणारे शास्त्र आहे – प्राचार्य डॉ. शिवानंद अडकिणे
Next articleशिवसेना एक पाऊल मागे येण्यास तयार, परंतु एकनाथ शिदेंच्या मनात काही वेगळेच…?
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here