Home नांदेड सोयाबीन बियाणे पेरले पण उगवलेच नाही ; शेतक-यांना आर्थिक फटका

सोयाबीन बियाणे पेरले पण उगवलेच नाही ; शेतक-यांना आर्थिक फटका

33
0

आशाताई बच्छाव

IMG-20220702-WA0015.jpg

सोयाबीन बियाणे पेरले पण उगवलेच नाही ; शेतक-यांना आर्थिक फटका

बोगस बियाणे बाजारात विक्री करणाऱ्या कंपन्यावर कार्यवाही करा.

भाजपा शहराध्यक्ष चौव्हाण यांची तहसीलदार, कृषीधिकारी यांच्याकडे तक्रार.

नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

मुखेड तालुक्यात खरीप हंगाम 2021- 22 या सालासाठी शेतक-­यांनी सोयाबीन बियाणे पेरणी केली पण पेरलेले बोगस बियाने उगवलेच नसल्याने शेतकरी राजाला आर्थिक फटका बसला आहे त्यामुळे बोगस सोयाबीनचे बियाणे बाजारात विक्री करणाऱ्या कंपण्यावर कार्यवाही करण्याची मागणी भाजपा शहराध्यक्ष किशोरसिंह चौव्हान यांनी तहसिलदार व कृषि अधिकारी मुखेड यांच्याकडे दि.01 जुलै 2022 रोजी निवेदनाद्वारे केली आहे.
कृषि केंद्रामध्ये ईगल सिडस, वरदान सिडस, ग्रिन गोल्ड औरंगाबाद, ग्रिन गोल्ड इंदोर, सारस सिडस, 9305 ईगल, राधे सारस, समर्थ सिडस, यशोदा सिडस, बुस्टर सिडस, कुबेर,आरोही सिडस आदी कंपन्याचे हजारो बॅगाचे सोयाबिन बियाणे बोगस निघाले असुन यामुळे शेतक-­याला मोठया प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे. खरीप हंगामाची पेरणी केल्यानंतर 14 दिवस झाल्यानंतरही बियाणे उगवले नाहीत.यामुळे शेतकरी कृषि केंद्राकडे जाऊन तक्रारी करीत आहेत. पण कृषि दुकानदार शेतक-­यांच्या तक्रारीची दखल घेत नाहीत, कृषि अधिका­-यांनी सुध्दा याकडे दुर्लक्ष करीत आहेत त्यामुळे शेतकरी हतबल होत आहे संबंधीत विभागाचे अधिकारी व सिड कंपन्याच्या मिलीभगतमुळे शेतकरी देशोधडीला लागला असुन शेतक-याला न्याय मिळवून देण्यासाठी संबधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देवून बोगस बियाणे बाजारात विक्री करणाऱ्या कंपनिवर कारवाई करावी अन्यथा तालुक्यातील शेतकरी रस्त्यावर उतरुन आंदोलन करतील यात काही अनुचित प्रकार घडल्यास संपुर्णपणे प्रशासन जबाबदार राहील. याची गांभीर्याने नोंद घ्यावी असे निवेदन किशोरसिंह चौहाण यांनी दिले. यावेळी युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष हनमंत पाटील नरोटे, भाजपाचे शहर सरचिटणीस विनोद दंडलवाड, सुधीर चव्हाण, राजू रणबीडकर, समीर गजगे, सचिन पवार, शिवराज सिंह ठाकूर, गणेश आंबेकर, चंद्रकांत सुवर्णकार, पंढरीनाथ कोंडेवाड, संभाजी बिराजदार आदीसह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते

Previous articleनांदेड जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 16.40 मि.मी. पाऊस
Next articleसोयाबीन बियाणे पेरले पण उगवलेच नाही ; शेतक-यांना आर्थिक फटका
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here