Home नाशिक स्वराज्य संघटनेच्या नुतन विश्वस्त, संचालक, विभागीय व विविध जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती जाहीर–

स्वराज्य संघटनेच्या नुतन विश्वस्त, संचालक, विभागीय व विविध जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती जाहीर–

486
0

आशाताई बच्छाव

IMG-20230522-WA0033.jpg

स्वराज्य संघटनेच्या नुतन विश्वस्त, संचालक, विभागीय व विविध जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती जाहीर–

योगेश पाटील राज्य सचिव तर हारुन भाई शेख महाराष्ट्र राज्य सरचिटणीस

दैनिक युवा मराठा 
निफाड (रामभाऊ आवारे)

भारत सरकार मान्यता प्राप्त व आयएसओ मानांकित
स्वराज्य पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेच्या महाराष्ट्र राज्य नूतन विश्वस्त मंडळ राज्य संचालक मंडळ व विविध जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण व माहिती अधिकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दीपक जी कांबळे यांच्या आदेशानुसार व संघटनेचे कर्तव्यदक्ष महासचिव कमलेश (देवा) शेवाळे यांच्या शिफारशीनुसार संघटनेच्या विश्वस्त व संचालक मंडळांना पदोन्नती देण्यात आली असून योगेश पाटील यांची राज्य सचिव तर संघटनेचे विश्वस्त हारुनभाई शेख यांची राज्य सरचिटणीस पदी पदोन्नती करण्यात आली असल्याची माहिती स्वराज्य संघटनेचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष पत्रकार रामभाऊ आवारे सर (वनसगाव) यांनी दिली आहे.
संस्थापक अध्यक्ष दीपक जी कांबळे व संघटनेचे मुख्य महासचिव कमलेश जी शेवाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुढील प्रमाणे नियुक्ती व पदोन्नती देण्यात आली आहे-
सौ धनश्रीताई उत्पात विश्वस्त तथा महाराष्ट्र राज्य महिला राज्य संपर्क प्रमुख, विश्वस्त तथा महाराष्ट्र राज्य समन्वयक,भरत नजन,विश्वस्त तथा महाराष्ट्र राज्य प्रसिद्धीप्रमुख उमेश काशीकर, विश्वस्त तथा महाराष्ट्र राज्य सचिव योगेश पाटील, आणि विश्वस्त तथा महाराष्ट्र राज्य सरचिटणीस हारुनभाई शेख यांची निवड जाहीर केली.
संचालक तथा मुंबई विभाग सचिव सौ सविता तावरे, संचालक तथा पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस सौ मंजुषा डोईफोडे,संचालक तथा पुणे जिल्हा महिला अध्यक्ष सौ संगीता बोराडे, संचालक तथा उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस योगेश ददंणे संचालक तथा कोल्हापूर जिल्हाध्यक्ष प्रशांत निकम, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष संतोष जावळे यांच्या नियुक्ती जाहीर केल्या. सर्व विश्वस्तांना व संचालकांना मा.समाज कल्याण मंत्री बबनरावजी घोलप साहेब,मा आमदार योगेश बापू घोलप,मा महापौर नयना (वालझाडे) घोलप यांनी पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत तसेच वरील निवडीबाबत सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

संघटनेच्या उत्कर्ष व संघटनशक्ती मजबुती करता प्राधान्य देणार

स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण व माहिती अधिकार संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष दीपक जी कांबळे व कर्तव्यदक्ष मुख्य महासचिव कमलेश (देवा) शेवाळे यांनी आमच्यावर विश्वास ठेवून विश्वस्तांना पदोन्नती व विभागीय संचालक व विविध ठिकाणच्या पदोन्नत्या करताना एकंदरीत कामकाजाचा विचार करून निवड करण्यात आली असून संघटनेचे हित त्याचबरोबर संघटनेचा उत्कर्ष व संघटन मजबूत कशा पद्धतीने करता येईल यासाठी आम्ही सर्व एकदिलाने संघटनेच्या वाढीसाठी प्राधान्य देणार आहोत.

भरत नजन – महाराष्ट्र राज्य समन्वयक स्वराज्य संघटना

Previous articleझुणका भाकर केंद्रातून गांजा विक्री, सीपीच्या विशेष पथकाची धाड.
Next articleअमरावती जिल्ह्यातील दर्यापूर अंजनगाव मार्गावरील लेहगाव इटकी आता जवळ भीषण अपघात; ५ ठार७ जखमी.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here