Home अमरावती झुणका भाकर केंद्रातून गांजा विक्री, सीपीच्या विशेष पथकाची धाड.

झुणका भाकर केंद्रातून गांजा विक्री, सीपीच्या विशेष पथकाची धाड.

91
0

आशाताई बच्छाव

IMG-20230522-WA0039.jpg

झुणका भाकर केंद्रातून गांजा विक्री, सीपीच्या विशेष पथकाची धाड.
ऐकावे  ते नवलच!
दैनिक युवा मराठा.
पी एन देशमुख
ब्युरो चीफ रिपोर्टर.
अमरावती.
अमरावती येथील वेलकम पॉईंट स्थिती एका झुणका भाकर केंद्रातून चक्क गांजा विक्री करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस आयुक्त च्या विशेष पथकाच्या कारवाईत उघड झाला. विशेष पथकाने विशेष पथकाने 21 मे रोजी रात्री वेलकम येथील एका झुणका भाकर केंद्रावर दहा टाकून तब्बल १० किलो ८५५ ग्राम गांजा जप्त केला. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. अविनाश रामकृष्ण डकरे (५४)रा. योगीराज नगर, रहाटगाव असे अटक आरोपीचे नाव आहे. अविनाश वेलकम टी पॉईंट येथे वैष्णवी झुणका भाकर केंद्र आहे. या झुणका भाकर केंद्रात अडून अविनाश हा गांजाची विक्री करीत होता. याबाबत पोलिस आयुक्तांच्या पथकाला माहिती मिळाली.या माहितीच्या आधारावर विशेष पथकाने रविवारी रात्री ११.१०च्या सुमारास या झुणका भाकर केंद्रात टाकली. झेडपी झुणका भाकर केंद्रामध्ये कापडी पिशव्यांमध्ये १लाख३० हजार रुपयाचा१०कीलो८५५ ग्राम गांजा आढळून आला. त्यानुसार पथकाने अविनाश ला अटक करून गांजा मोबाईलवर रोख असा एकूण एक लाख 40 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी अविनाश विरुद्ध गाडगे नगर पोलीस ठाण्यात एन डी पी एस कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक गजानन राजमलु, सुनील लासुरकर, यांनी ही कारवाई केली. तसेच जुनी वस्ती बडनेरा येथील अल्मास गेट भागातून अशोक चांदेकर (रा. बारीपुरा) यांच्याकडून गांजा असलेली चिलम, रिकामे प्लास्टिक पाऊस, एक माचिस असा गांजा पिण्याचे साहित्य जप्त करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here