Home नांदेड आयडियल इंग्लिश स्कूल देगलूर येथे ७५ वा संविधान दिन उत्साहात साजरा.

आयडियल इंग्लिश स्कूल देगलूर येथे ७५ वा संविधान दिन उत्साहात साजरा.

36
0

आशाताई बच्छाव

IMG-20221126-WA0073.jpg

आयडियल इंग्लिश स्कूल देगलूर येथे ७५ वा संविधान दिन उत्साहात साजरा.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
देगलुर – फुले शाहू आंबेडकर सेवाभावी संस्था अंतर्गत आयडीयल इंग्लिश स्कूलमध्ये ७५ वा संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमूख पाहुणे म्हणून देगलुर नगरीचे आदर्श तरुण व्यक्तिमत्व , दिलदार नेतृत्व म्हणून सुप्रसिद्ध असलेले आदरणीय मा. नगरसेवक सुशीलकुमार विठ्ठलराव देगलूरकर उपस्थित होते. तसेच शिवराज कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी फुले शाहू आंबेडकर सेवाभावी संस्थेचे संचालक प्रा.मारोती लक्ष्मणराव सोनकांबळे, तसेच प्राचार्या सौ. सुनंदा मॅडम, प्रियांका मॅडम, दिव्या मॅडम, रुपाली मॅडम, दंतुलवार मॅडम, व सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न,प.पू.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन आदरणीय सुशीलकुमार देगलूरकर यांच्या यांच्या हस्ते करण्यात आले. उपस्थित सर्वांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय समाजाला एका प्रेमळ, न्यायाच्या , समता, स्वातंत्र्य, बंधुता या धाग्याने बाधून देशात सर्वांना शांती, सुखी समाधानी जिवन जगता आले पाहिजे. म्हणून त्यांनी २ वर्ष,११ महिने,१८ दिवस अहोरात्र जागून सर्व भावी पिढीला, भारतीय समाजाला सुखी समाधानी जिवन जगण्याचा मूलमंत्र संविधानाच्या रूपाने दिला. याची सविस्तर मांडणी सुशीलकुमार देगलूरकर यांनी केली. तसेच प्रा.सोनकांबळे सर यांनी संविधान दिनाच्या अनुषंगाने ऐतिहासिकआढावा सांगितला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियंका मॅडम यांनी केले. तर आभार प्रदर्शन रुपाली मॅडम यांनी केले.

Previous articleमनसेच्या वतीने वडगाव मध्ये राज्यपाल कोश्यारी यांचा निषेध.
Next articleसंविधान दिनानिमित्त आयोजित रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here