Home बुलढाणा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्कची कारवाई, आचारसंहिता कालावधीत १७ गुन्हे झाले...

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्कची कारवाई, आचारसंहिता कालावधीत १७ गुन्हे झाले दाखल…

29
0

आशाताई बच्छाव

IMG_20240325_151217.jpg

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्कची कारवाई, आचारसंहिता कालावधीत १७ गुन्हे झाले दाखल…

बुलडाणा : युवा मराठा न्युज मोताळा तालुका प्रतिनिधी संजय पन्हाळकर

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्कने अवैध मध्यविक्रीबाबत कारवाई सुरू केली आहे. या कारवाईमध्ये आचारसंहिता लागू झाल्यापासून 17 गुन्हे नोंदविण्यात आले असून यात 17 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने चालू मार्च महिन्यात आतापर्यंत एकुण ६१ गुन्हे नोंदविले आहे. यात ६१ वारस गुन्हे, ६१ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच २ वाहनासह एकुण २५ लाख ८१ हजार १४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यांमध्ये १६२.७४ लिटर देशी मद्य, ३४.७४ लिटर विदेशी मद्य, २८ लिटर ताडी, १० हजार ८२५ लिटर रसायन सडवा, ५९५ लिटर हातभट्टी, ११.५ लिटर बिअर मद्य पकडण्यात आले.
आचारसंहिता कालावधीत अवैध मध्यविक्री विरोधात विशेष मोहिम राबवून एकूण १७ गुन्हे नोंदविण्यात आले आहे. यात १७ वारस गुन्हे नोंद करून १७ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच २ वाहनासह एकुण २ लाख ५९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्यांमध्ये देशी मद्य ५५.९३ लिटर, विदेशी मद्य १२.२४ लिटर, रसायन सडवा १ हजार ७८८ लिटर, हातभट्टी १२४ लिटर, बिअर ७.८ लिटर मद्य पकडण्यात आले आहे. तसेच विभागाकडून राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गावर सीमा तपासणी नाक्यावर चेकपोस्ट तयार करण्यात आले आहे.
तसेच दैनंदीन मद्यविक्री माहितीचा भरणा केलेला नसलेल्या हॉटेल फ्रेण्डस, गौरव वाईनबार शेगाव, हॉटेल विशाल शेगाव, हॉटेल न्यू अजय खामगाव, हॉटेल विश्वजित शेगाव, हॉटेल सुर्या शेगाव, हॉटेल ग्रीनलॅण्ड बुलडाणा आणि हॉटेल विजय शेगाव यांच्या अनुज्ञप्ती ७ दिवसांसाठी निलंबित करण्यात आल्या आहेत. यानंतरही आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन केले नसल्यास अनुज्ञप्तीधारकांविरुद्ध कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच अनुज्ञप्तींची मद्यविक्री सरासरीपेक्षा ३० टक्के जास्त किंवा कमी झाल्यास अशा अनुज्ञप्तींचे सखोल निरीक्षण करण्यात येणार आहे.
तसेच परिसरात अवैध मद्य विक्री अथवा बनावट मद्यनिर्मिती आढळल्यास टोल फ्री नंबर १८००८३३३३३, व्हॉटसॲप नंबर ८४२२००११३३ किंवा excisesuvidha.mahaonline.gov.in या पोर्टलवर तात्काळ माहिती कळवावी, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्कच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी केले आहे.

Previous articleमोताळा तालुक्यात अंगणवाडी मदतनीसचा विनयभंग, गुन्हा दाखल
Next articleआसई येथील योगेश कोरडे यांचा ट्रक्टर पलटी होऊन अपघाती मृत्यू
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here