Home नांदेड लोहा पोलीस स्टेशन मध्ये शर्टाच्या गुंड्या मोकळ्या सोडून असभ्य वर्तन करणाऱ्या चौघांवर...

लोहा पोलीस स्टेशन मध्ये शर्टाच्या गुंड्या मोकळ्या सोडून असभ्य वर्तन करणाऱ्या चौघांवर कारवाई

168

आशाताई बच्छाव

IMG-20230920-WA0062.jpg

लोहा पोलीस स्टेशन मध्ये शर्टाच्या गुंड्या मोकळ्या सोडून असभ्य वर्तन करणाऱ्या चौघांवर कारवाई
लोहा,(प्रतिनिधी)
लोहा पोलीस स्टेशन मध्ये शर्टाच्या गुंड्या मोकळ्या सोडून फिरणाऱ्या 4 जणावर मुंबई पोलीस अधिनियम 110/117 प्रमाणे चार केसेस दाखल करण्यात आले.सार्वजनिक ठिकाणी कोणत्या प्रकारे वर्तन करावे याबाबत मुंबई पोलीस अधिनियम 1951 मध्ये सांगितले आहे.पोलीस स्टेशन हे एक सार्वजनिक आणि शिस्तीचे ठिकाण असल्याचे पो.नि.चिंचोलीकर म्हणाले.
पोलीस स्टेशन मध्येच आपल्या शर्टाच्या गुंड्या मोकळ्या ठेवून असभ्य वर्तन करणाऱ्या लोकांवर काल दि.(१८) सप्टेंबर रोजी लोहा पोलीसांकडून कारवाई करण्यात आली.
लोहा पोलीस स्टेशन येथे विविध कामानिमित्ताने किंवा बोलावल्या म्हणून आलेल्या चार लोकांनी त्यांच्या शर्टाच्या गुंड्या मोकळ्या ठेवून पोलीस स्टेशनला कोणत्याही कामानिमित्त जरी गेले असाल तरी आपले वर्तन हे सभ्य असावे,आपली बोलीभाषा, आपला आवाज हा कमी असावा अन्यथा 110/112/117 प्रमाणे कारवाई होऊ शकते असेही पोलीस निरीक्षक ओमकार चिंचोलकर यांच्याकडून सांगण्यात आले.

Previous articleरिंधा नावे खंडणी मागणाऱ्या आरोपीस कंधार जिल्हा व सत्र न्यायालयाने दिला जामीन
Next articleसर्व निरोगी नागरिकांनी देशाचे आरोग्य उंचावण्यासाठी रक्तदान करणे आवश्यक
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.