Home नांदेड रिंधा नावे खंडणी मागणाऱ्या आरोपीस कंधार जिल्हा व सत्र न्यायालयाने दिला जामीन

रिंधा नावे खंडणी मागणाऱ्या आरोपीस कंधार जिल्हा व सत्र न्यायालयाने दिला जामीन

42
0

आशाताई बच्छाव

IMG-20230920-WA0063.jpg

रिंधा नावे खंडणी मागणाऱ्या आरोपीस कंधार जिल्हा व सत्र न्यायालयाने दिला जामीन
लोहा,
रिंधा नावाने कांहीं काळ नांदेड सह परिसरात मोठी दहशत निर्माण झाली होती. मात्र पोलिसांच्या कार्यवाहीच्या भीतीने रींधाने नांदेडातून पळ काढला. त्यानंतर रींधा गँगच्या नावे अनेकांनी खंडणी मागण्याचा प्रताप घडवून आणल्याचे अनेक प्रकार समोर आले. त्याच कालावधीत मागील जून महिन्यात रींधाच्या नावाने एका व्यापाऱ्यास कॉल करून एक कोटीची मागणी केली आसता सदरील व्यापाऱ्याने पोलिसांशी संपर्क साधून तक्रार दिली. त्यानुसार ढाकणी शिवरातून सापळा रचून पोलिसांनी आरोपीस अटक केली होती. त्यास कंधार येथील जिल्हा सत्र नायालयात उभे केले असता न्यायालयाने त्यास जमीन मंजूर केला.
लोहा तालुक्यातील ढाकणी शिवारात मागील जून महिन्यात नाट्यमय घडामोड घडली होती. दि. २९ जून रोजी नांदेड येथील व्यापारी तेजस हरिकिशन लोहिया यांना एका भ्रमणध्वनी व्हॉट्स अँप वरून फोन कॉल करत “मैं रींधा बात कर रहा हूँ.” असे म्हणून ” जीवे मारण्याची धमकी देत एक कोटी रुपये खंडणीची मागणी सातत्याने केली. घाबरलेल्या तेजस लोहिया याने प्रारंभी दोन लाख देतो व उर्वरित रक्कम टप्या टप्याने देतो असे सांगून दि. २९ जून रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास लोहा तालुक्यातील ढाकणी शिवारातील एका खडी मशीन केंद्रालागत खंडणी तील रक्कम देण्याचे ठरले. दरम्यान फिर्यादी लोहीयाने उपविभागीय पोलीस अधिकारी गुरव यांना भेटून सदर घटने प्रकरणी तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांना सदर ठिकाणी सापळा लावला. या प्रसंगी फिर्यादी तेजस लोहिया व आरोपी गुरुदिपसिंग सिंधू यांच्यात झटापट सुरू असताना दबा धरुन बसलेल्या पोलिसांनी आरोपीस पकडण्याचा प्रयत्न केला. पोलिस आल्याचे पाहून बिथरलेल्या आरोपी सिंधू याने पोलिसांच्या दिशेने बंदुकीतून गोळी झाडली. प्रत्युत्तरात पोलिसांनीही आरोपीच्या गाडीच्या दिशेने बंदुकीतून गोळी झाडली. त्यानंतर पोलिसांना आरोपीस प्रयत्नांती पकडण्यात यश मिळाले. सदरील घटने प्रकरणी सोनखेड पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला होता.
सदर घटनेतील आरोपी सिंधू यास कंधार येथील जिल्हा व सत्र न्यायालयात उभे केले असता आरोपी गुरूदीपसिंग सिंधू यास न्यायाधीश माधुरी आनंद यांनी जामीन मंजूर केला.
आरोपीकडून अॅड. फय्याज दादेखाँ पठाण यांनी युक्तीवाद केला.

Previous articleसामाजिक कार्यकर्ते धीरज हाके यांना राजे होळकर सन्मान पुरस्कार
Next articleलोहा पोलीस स्टेशन मध्ये शर्टाच्या गुंड्या मोकळ्या सोडून असभ्य वर्तन करणाऱ्या चौघांवर कारवाई
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here