Home मुंबई ग्राहक सेवा संस्थेच्या अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी डी मार्ट च्या सेल्स मॅनेजरला विचारला...

ग्राहक सेवा संस्थेच्या अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी डी मार्ट च्या सेल्स मॅनेजरला विचारला जाब

59
0

आशाताई बच्छाव

IMG_20240218_080709.jpg

ग्राहक सेवा संस्थेच्या अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी डी मार्ट च्या सेल्स मॅनेजरला विचारला जाब
युवा मराठा न्यूज
सविता तावरे-मुंबई स्पेशल रीपोर्टर
आज सकाळी ग्राहक सेवा संस्थेचे सदस्य योगेश कुर्ले यांना म्हाडा विरार येथे राहणारे श्री. दिवाकर दास ह्यांनी सांगितले, मी दि. ०३/०१/२०२४ रोजी विरार डी मार्ट येथून मामाअर्थ (Mama earth) कंपनीचे एकावर एक मोफत फेस क्रीम (Buy One Get One Free Face Cream) विकत घेतले. क्रीमचा वापर केल्यानंतर काही दिवसातच दास यांच्या पत्नीच्या चेहऱ्यावर काळे डाग दिसायला लागले. तसे ते बोरीवली येथील महिला डॉक्टरकडे गेले असता डॉक्टरांनी सांगितले फेस क्रीम मुळे झाले आहे, त्यांनी जेव्हा क्रीम बघितल्यावर असे दिसले एका क्रीम च्या डब्यावर कालबाह्यता तारीख (Expiry Date) दिसत नव्हती. त्याच डब्यातील फेस क्रीम वापरीली होती. आपले सदस्य श्री. योगेश कुर्ले यांनी माझ्याशी संपर्क साधला व दास यांना बोलावून घेतले. दास यांनी सर्व हकीकत मला सांगितली तसेच ज्या डॉक्टरकडे त्यांच्याशी मी फोन वरुन संपर्क साधला त्यांनीही क्रिम मुळे झाले आहे असे सांगितले. हा सर्व प्रकार काय आहे म्हणून आम्ही तिघे डिमार्ट येथे गेलो त्यांना झालेला प्रकारचा जाब विचारला असता त्यांनी आमच्यांकडे एक तासाचा वेळ मागितला व म्हणाले आम्ही कंपनीच्या मैनेजर आणि डी मार्ट चे सेल्स मैनेजर यांना बोलावून घेतो माझा फोन नं दिला व माझे कार्ड दिले.
एक तासाने त्यांनी मला फोन केला मी स्वत: गितेंद्र कमलाकर मिर्लेकर संस्थापक अध्यक्ष जाताना आपले सदस्य योगेश कुर्ले, सुरेश कांबळी साहेब व श्री. महेंद्र भंडारी तसेच पत्रकार विनायक खर्डे व सचिन कदम आम्ही डी मार्ट येथे गेलो आम्हाला त्यांच्या तिसऱ्या माळ्यावर खाजगी कार्यालयात (Personal Office) घेऊन गेले. तेथे मामाअर्थ कंपनीच्या महिला मैनेजर व डिमार्ट चे सेल्स मैनेजर होते. त्यांना झालेल्या प्रकाराचा जाब विचारला असता त्यांची चुक मान्य करायला तयार नव्हते. जसे आपले सदस्य व पत्रकारांनी धारेवर घेतल्यावर त्यांचे धाबे दणाणले. तशी त्यांनी त्यांची चुक मान्य केली. तसेच महिलेच्या चेहऱ्यावर जे डाग पडलेत त्या बाबत आमचे लवकरच डॉक्टर स्वत: त्यांच्या घरी जाऊन तपासणी करतील. जो काही खर्च होईल तो आम्ही करू. असा प्रकार परत कधी होणार नाही. आम्ही पूर्ण दक्षता घेऊ असे आश्वासन दिले. त्यांचा फोन नं दिला
दास यांनी ग्राहक सेवा संस्थेचे पदाधिकारी व पत्रकारांचे मन:पूर्वक आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here