Home नाशिक मनु मानसी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था नाशिक संस्थेचा वर्धापन दिन आणि हळदी...

मनु मानसी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था नाशिक संस्थेचा वर्धापन दिन आणि हळदी कुंकू ओरा फाईन डायमंड ज्वेलरी येथे साजरा करण्यात आला.

19
0

आशाताई बच्छाव

IMG_20240218_081005.jpg

मनु मानसी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था नाशिक संस्थेचा वर्धापन दिन आणि हळदी कुंकू ओरा नाशिक,(अँड विनया नागरे प्रतिनिधी)-फाईन डायमंड ज्वेलरी येथे साजरा करण्यात आला.
मनु मानसी संस्थेचा दुसरा वर्धापन दिन काल ओरा डायमंड ज्वेलरी येथे दुपारी दोन वाजता ओरा ज्वेलरी यांच्या मोलाच्या सहकार्याने उत्साही आणि आनंदी वातावरणात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात गणेशाचे स्मरण करून केली. गणपती बाप्पा चे प्रतिमा पूजन आणि दिप प्रज्वलन प्रमूख अतिथी यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रमूख अतिथी मा.ओरा डायमंड ज्वेलरी चे मॅनेजर राधेय सर, अरबाज सर, मा. पल्लवी कुलकर्णी समाजसेविका, मा. प्रियंका येवले. मॉडेलिंग, संचालिका ओझर टेक्सटाइल , मा. ज्योती केदारे ग्रामसेविका आणि मनू मानसी संस्थेच्या अध्यक्षा सौ मेघा राजेश शिंपी हे होते. मनू मानसी संस्थेचा वर्षभर केलेल्या कार्याचा आढावा सौ. मेघा शिंपी यांनी सांगितला. मान्यवरांना ट्रॉफी गुलाबपुष्प आणि तुळसीचे रोपे देऊन सन्मानित करण्यात आले.
मनु मानसी संस्थेचा वर्धापन दिनानिमित्त 2023मध्ये संस्थेसाठी ज्या मैत्रिणीनी मोलाची साथ सहकार्य आणि प्रेम दिले. मनू मानसी संस्थेच्या सामाजिक कार्य आणि इतर कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडले. अश्या मैत्रीणीचा हळदी कुंकू लावून,ट्रॉफी आणि गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. कविता पाटील, अँड सौ.विनया अमित नागरे, राजनंदिनी आहिरे, धनश्री गायधनी, मिरा आवारे, वर्षा चौधरी, पल्लवी कुंवर , यमुना लिंगायत, मनिषा विसपुते, नैना राजपूत, स्नेहा शिंपी, कविता बाविस्कर, प्रीती बच्छाव, दिपिका पाटील, सुनिता गांगुर्डे, हेमलता वानखेडे, संध्या चोरडिया, जया बुरूंगे यांना मनू मानसी संस्थेच्या वतीने सन्मानित करण्यात आले. मोलाचे सहकार्य स्मिता आहेर यांचे मिळाले. सूत्र संचालन रचना चींतांवर यांनी केले. हळदी कुंकू साठी आलेल्या मैत्रिणींनी सौभाग्याचे वाण लुटून मंगलमय वातावरणात मनू मानसी संस्थेचा वर्धापन दिन पार पडला. मनू मानसी संस्थेच्या सौ. मेघा राजेश शिंपी संस्थापिका यांनी आभार व्यक्त केले.

Previous articleग्राहक सेवा संस्थेच्या अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी डी मार्ट च्या सेल्स मॅनेजरला विचारला जाब
Next articleविज्ञान शाप की वरदान!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here