Home सामाजिक विज्ञान शाप की वरदान!

विज्ञान शाप की वरदान!

29
0

आशाताई बच्छाव

IMG_20240218_082716.jpg

विज्ञान शाप की वरदान!
परमेश्वराने सृष्टी निर्मिती केली आणि आपण केलेली सृष्टी पाहून तो सुखावला. त्या सृष्टीतील मानव प्राण्याला त्यांनी बुद्धी दिली, त्याला श्रेष्ठत्व दिलं पण पुढील त्याच्या कार्याबद्दल अनेक अपेक्षा ठेवल्या. मानवाने ही या बुद्धीचा पुरेपूर उपयोग केला आणि स्वतःची प्रगती करून घेतली विज्ञानाची निर्मिती त्याने केली.
दिवस कालचा आज संपला,
प्रभा उद्याची दिसली रे,
विज्ञानाचे युग हे आले,
चला स्वागत सामोरे.
असे म्हणत येणाऱ्या प्रत्येक दिवशी तो विज्ञानाचे बोट धरून पुढे पुढे चालत गेला. ही वाटचाल एवढ्या दूर सुरू आहे की, आता सध्या तर तो विज्ञानाच्या गुलामच झाला आहे असे वाटते. विज्ञान हे मानवाला मिळालेले एक वरदान आहे. ती एक प्रकारची दिव्यशक्तीच आहे. मानवाने जर विज्ञानाची कास धरली नसती तर मानव मूळच्या आदिमानवासारखाच राहिला असता. आज झालेली भव्य, दिव्य प्रगती आपल्याला पाहायलाच मिळाली नसती. ज्याप्रमाणे परिस लोखंडाला स्पर्श करतात त्याचे सोने होते त्याचप्रमाणे विज्ञान हे ज्या ज्या क्षेत्राला स्पर्शून गेले तेथे क्षेत्र समृद्ध बनते.
विज्ञानाच्या सहाय्याने मानवाने अंतराळात प्रवेश केला. केवळ कल्पनेत असलेल्या चंद्राचे खरे स्वरूप जगा पुढे आले. केवळ अंतराळातच नव्हे तर अथांग समुद्राच्या तळाशी एवढ्या खोलवर डुबकी मारली की तेथील जीवन आपल्यासमोर आले. विज्ञानाने घराचा उंबरठा ओलांडून थेट स्वयंपाक घरापर्यंत प्रवेश केला आहे. विज्ञानाने लागलेल्या नवनव्या शोधामुळे स्त्रियांची नियमित कामे अतिशय कमी झाली आहेत व तिला आता थोडासा विसावा मिळाला आहे. पूर्वी ज्या रोगावरील उपचार अतिशय कठीण असे होते, अशा रोगांवर आता अतिशय सोपे असे उपचार विज्ञानाच्या साह्याने शोधण्यात आले आहेत. यामुळे मृत्यू दर कमी झाला आहे. अपंग अवयवावर मात करून कृत्रिम अवयव वापरून माणूस आपल्या कार्याला जिद्दीने पूर्ण करू शकतो. विज्ञानाच्या सहाय्याने शेती व्यवसायात देखील क्रांती घडवून आलेली आहे. ट्रॅक्टर व इतर यंत्राच्या साह्याने शेतीची कामे अत्यंत सोप्या पद्धतीने व अतिशय वेगाने करणे शक्य झाले आहे. म्हणून शेतीची उत्पादकता वाढून देशातील लोकांच्या अन्नधान्याच्या गरजा पूर्ण करता येणे शक्य झाले आहे.
वीज ही विज्ञानाने मानवाला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. आज वीजेशिवाय आपल्याला कोणतेही काम करणे अतिशय कठीण झाले आहे. या वीजेमुळे पंखा फिरतो, टीव्ही चालतो, फ्रिज काम करतो हे सर्व आपल्यासाठी अतिशय आवश्यक झाले आहे. त्यामुळे वीजअतिशय महत्त्वाची ठरते.
वैज्ञानिक शोधांचे एक अमूल्य असे वरदान म्हणजे त्यामुळे आपल्या अंधश्रद्धा संपुष्टात येत आहेत. शकुन अपशकुन यासारख्या निरर्थक गोष्टी समाजामधून निघू लागल्या आहेत. ग्रहणाविषयीच्या संपूर्ण अंधश्रद्धा, चालीरीती, समजूती संपुष्टात आलेल्या आहेत. त्यामुळे माणसाचे मागासले पण दूर होऊ लागले आहे. जळी, स्थळी, काष्टी, पाषानी विज्ञानच विज्ञानात विज्ञानाचे हे चमत्कार पाहून सुप्रसिद्ध लेखक श्री.म.माहे विज्ञानाला ‘कामधेनू’ संबोधतात. असे हे वरददायी विज्ञान आज मात्र अभिशाप बनत चालले आहे. विज्ञानाच्या सहाय्याने औद्योगिक क्रांती झाली. अनेक कारखाने उभारण्यात आलेले आहेत. या कारखान्यातून वायु प्रदूषण होते. आजच्या युगात प्रदूषण ही आपल्यासमोर एक मोठी समस्या आहे. हे प्रदूषण जर अशा प्रकारेच वाढत गेले तर एके दिवशी आपल्या पृथ्वीचा नाश होईल हे नक्कीच. विज्ञानाच्या बळावर अनेक विनाशकारी शस्त्रांचा शोध लावण्यात आला आहे ही शस्त्रास्त्रे इतकी संहारक आहेत की काही क्षणातच संपूर्ण जीवसृष्टीचा नाश करता येतो. याचे एक ज्वलंत उदाहरण म्हणजे हिरोशिमा, नागासकी यानंतरचे अमेरिकेतील पेंटागॉन व वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेले हल्ले होय. खरे पाहता विज्ञान हे मानवासाठी वरदानच आहे. परंतु त्याचा दुरुपयोग किंवा अवाजवी उपयोग केल्यामुळे ते आता शाप ठरले आहे. विज्ञान ही दुधारी तलवार आहे. तिचा कसा उपयोग करायचा हे शेवटी या मानव जातीलाच ठरवायचे आहे. अजून आठवतो तो दिवस!आम्ही शेतकी महाविद्यालयास भेट देण्यास गेलो होतो. किती सुंदर सुंदर फळ आणि फुलं आली होती! रंगीत व मोठी ढोबळी मिरची पाहून तर असं वाटलं की ही खरी आहे की खोटी! खरंच विज्ञानाची किमया काही न्यारीच.
21 वे शतक उजाडले तेच मुली विज्ञानाची कास धरून आज प्रत्येक क्षेत्रात विज्ञानाचा प्रभाव दिसून येतो. कला,ज्ञान, साहित्य, व्यवसाय, उद्योगधंदे अशा सर्वच ठिकाणी विज्ञानाने आपले हजेरी लावली आहे. कमी वेळात, कमी श्रमात प्रचंड काम करण्याची ताकद केवळ विज्ञानात आहे. संगणक! हा तर आता मानवाचा आत्माच बनला आहे. प्रत्येक क्षेत्रात संगणकाचा वापर केला जातो. अगदी शाळांमधूनही संगणकाचा वापर होतो. खेड्यापाड्यापर्यंत हा संगणक पोहोचला आहे. दूरदर्शन, टेलिव्हिजन, मोबाईल अशा अनेक सुविधा मानवाला केवळ विज्ञानामुळेच मिळाल्या. केवढा हा फायदा मानवाला मिळाला! एक गोष्ट निश्चित की प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात अर्थातच एक गोष्ट विज्ञानही याला अपवाद नाही. विज्ञानामुळे जसे फायदे होतात तसेच काही तोटेही होतात. याचाच अर्थ असा की विज्ञानामुळे प्रगती झाली ही निश्चितच त्याचा योग्य पद्धतीने वापर केला म्हणजे विज्ञान हे वरदानच ठरणार आहे. केवळ मानवाने आपली मानसिकता बदलली पाहिजे.
विज्ञानाची कास धरा,
प्रगतीचा हा मंत्र खरा!
सविता तावरे.
महाराष्ट्र भूषण-मुंबई जिल्हा
युवा मराठा-मुंबई स्पेशल रिपोर्टर
स्वराज्य पोलीस मित्र संघटना
(संचालक तथा मुंबईअध्यक्षा)
ग्राहक सेवा संस्था
(मुंबई महिलाअध्यक्षा)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here