Home नांदेड सामाजिक कार्यकर्ते धीरज हाके यांना राजे होळकर सन्मान पुरस्कार

सामाजिक कार्यकर्ते धीरज हाके यांना राजे होळकर सन्मान पुरस्कार

102

आशाताई बच्छाव

IMG-20230920-WA0061.jpg

सामाजिक कार्यकर्ते धीरज हाके यांना राजे होळकर सन्मान पुरस्कार
लोहा,
तालुक्यातील मंगरूळ येथील बहुजन चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते धीरज भैय्या हाके यांनी केलेल्या विविध समाजपयोगी कार्याची दाखल घेत पुणे येथील मौर्य क्रांती संघाच्या वतीने प्रतिष्ठेचा समजला जाणारा राजे विठोबा होळकर सन्मान पुरस्कार नुकताच पुणे येथे प्रदान करण्यात आला.
नुकतीच पुणे येथे चौथी धनगर समाज जागृती परिषद पार पडली. सदरील परिषदेत धनगर समाजाची सद्याची दशा व उद्याची दिशा, धोरणे तसेच समाज संघटन आदी विषयांवर प्रमुख वक्त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बहुजन नायक तथा बामसेफ चे राष्ट्रीय अध्यक्ष
वामन मेश्राम तर उद्घाटक म्हणून गणेश हाके होते.
सदरील परिषदेत मौर्य क्रांती संघाच्या वतीने यंदाचा व प्रतिष्ठेचा समजला जाणारा राजे विठोजी होळकर सन्मान पुरस्कार लोहा येथील युवा सामाजिक कार्यकर्ते तथा वंचित बहुजन आघाडीचे दक्षिण युवा जिल्हाध्यक्ष धीरज भैय्या हाके यांना बहुजन नायक वामण मेश्राम यांच्या हस्ते प्रदान करून गौरविण्यात आले. याप्रसंगी माळेगांव यात्रा येथील सरपंच प्र. हनुमंत धुळगंडे सह मान्यवरांची उपस्थिती होती. हाके यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

Previous articleमाढा महाळुंग श्रीपुर नगरपंचायतीसाठी ५ कोटीची आ. रणजितसिंह मोहिते-पाटील यांची मागणी
Next articleरिंधा नावे खंडणी मागणाऱ्या आरोपीस कंधार जिल्हा व सत्र न्यायालयाने दिला जामीन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.