Home अमरावती नवनीत राणांना”सुप्रीम कोर्टाचा दिलासा”जात प्रमाणपत्र बाबत दिला महत्त्वाचा निकाल.

नवनीत राणांना”सुप्रीम कोर्टाचा दिलासा”जात प्रमाणपत्र बाबत दिला महत्त्वाचा निकाल.

54
0

आशाताई बच्छाव

IMG_20240404_183929.jpg

नवनीत राणांना”सुप्रीम कोर्टाचा दिलासा”जात प्रमाणपत्र बाबत दिला महत्त्वाचा निकाल.
दैनिक युवा मराठा
पी.एन. देशमुख
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती
सुप्रीम कोर्टाने आपला निकाल राखून ठेवला होता. आज या प्रकरणी अंतिम निकाल देण्यात आला असून नवनीत राणा यांना मोठा दिलासा मिळाला.
अमरावती लोकसभा मतदारसंघातून भाजपची उमेदवारी मिळालेल्या नवनीत राणा यांना मोठा दिलासा मिळाला आहे कारण नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा मुंबई हायकोर्टाचा निर्णय आज सुप्रीम कोर्टाने बदलत राणा यांची जात प्रमाणपत्र वैद्य ठरविले आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशीच नवनीत राणा यांचा कायदेशीर अडचण दूर झाली आहे. मुंबई हायकोर्टाने नवनीत राणा यांची जात प्रमाणपत्र २०२१ मध्य अवैध ठरवले होते. त्यानंतर नवनीत राणा यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. याप्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनवणी झाली. त्यावेळी सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाच्या निकालाला स्थगिती दिली होती. तसेच, बोगस जात प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणाचा दोन्ही गटाचा युक्तिवाद २८ फेब्रुवारीला पूर्ण झाला आहे. सुप्रीम कोर्टाने याप्रकरणी आपला निकाल राखून ठेवला होता. आज या प्रकरणी अंतिम निकाल आला असून नवनीत राणा यांना मोठा दिलासा मिळाला आहे. निकाल देताना न्यायमूर्ती जे.के. माहेश्वरी आणि न्यायमूर्ती संजय करोल यांच्या खंडपीठाने सांगितले की छाननी समितीने योग्य चौकशी करून आणि संबंधित कागदपत्राचा विचार करून नवनीत राणा यांची जात प्रमाणपत्र वैद्य ठरवले आहे. त्यामुळे छाननी समितीच्या निष्कर्षात कोणताही हस्तक्षेपाचा गरज नसल्याचा सांगा सुप्रीम कोर्टाने मुंबई हायकोर्टाचा निर्णय बदलण्याची राणा यांची विनंती मान्य केली आहे. मुंबई हायकोर्टाने नवनीत राणा यांची जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा निर्णय दिला होता. नवनीत राणा यांच्या वडिलांनी डबा टाकून बोगस शाळा सोडल्याचा दाखला जात प्रमाणपत्रासाठी दिल्याचे सिद्ध झाले होते. तसेच हायकोर्टातील अनेक तारखांना नवनीत राणा आणि त्यांचे वडील गैरहजर राहिले होते. नवनीत राणा व त्यांचे वडील गैरहजर राहिले होते. नवनीत राणा आणि त्यांच्या वर्ल्ड वडीला विरोधात बुलंद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.

Previous articleसचिन दांगट मित्र परिवाराचे वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन …
Next articleलोकसभा निवडणुकीच्या धामधूमित नऊ सचिवांना शक्तीचे प्रशिक्षण, कार्यमुक्त होण्याचे आदेश.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here