Home Breaking News गांधी चौकात अतिक्रमणाचा धोकादायक विळखा , पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

गांधी चौकात अतिक्रमणाचा धोकादायक विळखा , पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

140
0

 

पेठ वडगांव : शहरातील पद्मारोडवरील मुख्य बाजारपेठ चौकात (गांधी चौक) अतिक्रमणाचा धोकादायक विळखा असून त्याकडे वडगांव नगरपालिकेने दुर्लक्ष केले आहे.
पद्मारोडवरील गांधीचौकामधे पुजेचे साहित्य , फळे विकणाऱ्या विक्रेता धोकादायक विजेच्या मोठ्या  डिपी (ट्रान्सफाँर्म) खाली बसुन विक्री करत आहे.                                        गांधीचौकातील फुटाणे टेलर्स दुकानासमोर गटारीवर मोठे धोकादायक भगदाड पडले असुन त्याकडेही पालिकेने दुर्लक्ष केले आहे.
सदर गांधी चौकामधिल जागेत विक्रेत्यांनी अतिक्रमण केले असुन त्यांच्या जिवाला धोका असुन डिपी (ट्रान्सफाँर्म) च्या खाली कोणालाही विक्रिस बसण्यासाठी परवानगी देऊ नये. सदर जागेस धोकादायक क्षेत्र घोषित करावे , एखाद्या वेळेस डिपी , (ट्रान्सफाँर्म ) वरती शार्टसर्कीट होऊन विक्रेत्यास किंवा ग्राहकांच्या जिवास धोका निर्माण होऊ शकतो, तेथिल विक्रेत्यांना विक्रीसाठी बसूनये यासाठी विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी वारंवार सुचना देऊनही विक्रेते जाणूनबुजून बसत आहेत.
पद्मारोड हा मुख्य बाजार पेठ असुन त्या रोडवरती मालवाहु छोटी मोठी वाहनांची रहदारी असते ,
सदर चौकामधे अतिक्रमण वाढल्यामुळे इतर वाहनास वळण घेताना आडथळा निर्माण होत आहे.
त्यामुळे वडगांव नगरपालिका प्रशासनाने तात्काळ त्या पुजेचे साहित्य विक्रेत्यास तेथून हलवावे अशी मागणी नागरिकांतुन होत आहे.

युवा मराठा न्यूज नेटवर्क .

Previous articleनिवार मुळे आंध्र प्रदेश तमिळनाडू पाँडिचेरीला धोक्याचा इशारा. विदर्भ मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात पावसाची शक्यता..
Next article. . . कोई लौटा दे मेरे, बीते हुए दिन !
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here