• Home
  • निवार मुळे आंध्र प्रदेश तमिळनाडू पाँडिचेरीला धोक्याचा इशारा. विदर्भ मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात पावसाची शक्यता..

निवार मुळे आंध्र प्रदेश तमिळनाडू पाँडिचेरीला धोक्याचा इशारा. विदर्भ मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात पावसाची शक्यता..

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20201126-WA0040.jpg

निवार मुळे आंध्र प्रदेश तमिळनाडू पाँडिचेरीला धोक्याचा इशारा. विदर्भ मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात पावसाची शक्यता..

मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
पुणे – बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या निवड चक्रीवादळाचे बुधवारी दिनांक 25 नोव्हेंबर रोजी तीव्रचक्रीवादळात रूपांतर झाले असून ते मध्यरात्री अथवा पहाटे तामिळनाडूच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. या पार्श्वभूमीवर आंध्रप्रदेश तामिळनाडु पांडिचेरी मध्ये धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच चक्रीवादळामुळे तामिळनाडू पांडिचेरी परिसरातील काही भागाला अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तर विदर्भ मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात शुक्रवारी पावसाची शक्यता वर्तविली आहे. सध्या हे चक्रीवादळ पांडिचेरी पासून 190 किमी अंतरावर आहे. ते मध्यरात्री अथवा पहाटे कराईकल आणि मल्लापुरम दरम्यान किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे त्यामुळे तामिळनाडू पोंडीचेरी परिसरात काही ठिकाणी अतिवृष्टी होईल असा इशारा दिला आहे हे चक्रीवादळ जमिनीवर आल्यावर त्याचा जोर कमी होणार आहे.26 नोव्हेंबरला त्याची तीव्रता कमी होऊन काही तासानंतर ते शांत होण्याची शक्यता आहे.

anews Banner

Leave A Comment