Home गुन्हेगारी महिला टोल कर्मचारी अन् पोलीस पत्नीत तुंबळ हाणामारी

महिला टोल कर्मचारी अन् पोलीस पत्नीत तुंबळ हाणामारी

52
0

आशाताई बच्छाव

IMG-20220915-WA0016.jpg

महिला टोल कर्मचारी अन् पोलीस पत्नीत तुंबळ हाणामारी

पिंपळगाव बसवंत (निफाड)-सागर कटाळे युवा मराठा न्यूज नेटवर्क चॅनेल निफाड तालुका प्रतिनिधी पिंपळगाव बसवंत येथील टोल नाक्यावर टोल भरण्याच्या किरकोळ
कारणातून महिला टोल कर्मचारी अन्
वाहनधारक पोलीस पत्नी यांच्यात वाद
झाला अन् त्याचे रूपांतर हाणामारीत
झाले. बुधवारी (दि. १४) सायंकाळच्या
सुमारास हा प्रकार घडला. पिंपळगाव
पोलिसांनी केलेल्या मध्यस्थीनंतर
संबंधित पोलीस पत्नीने माफीनाफा
लिहून दिल्याने तूर्तास प्रकरणावर
पडदा पडला. अधिक माहिती अशी की, निफाड तालुक्यातील सीआरपीएफ जवान
पत्नी व दोन मुलांसमवेत पुणे येथे
जात असताना बुधवारी सायंकाळच्या
सुमारास पिंपळगाव बसवंत टोलनाक्यावर
त्यांनी आपले शासकीय कार्ड दाखवून
खासगी वाहन सोडण्याची विनंती केली.
टोलनाक्यावरील महिला कर्मचाऱ्याने
तुम्हाला टोल भरवाच लागेल, कार्ड
चालणार नाही असे सांगितले. त्यानंतर
पोलीस कर्मचाऱ्याने पैसे देऊन टोल
भरल्यानंतर वाहनात बसलेली त्यांची
पत्नी व महिला टोल कर्मचाऱ्यांत शाब्दिक
बाचाबाची झाली. वाद विकोपाला गेल्याने दोन्ही
महिलांमध्ये टोलनाक्यावर तुंबळ हाणामारी झाली. काही वेळानंतर प्रकरण पोलीस ठाण्यात पोहचल्यानंतर टोल कर्मचाऱ्यांनी सुरवातीला गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पोलिसांनी दोन्ही बाजूचे म्हणने ऐकून घेतल्यानंतर परस्पर वाद मिटवीत सबुरीचा सल्ला दिला. टोल कर्मचाऱ्यांच्या मागणीनंतर पोलीस पत्नीने माफीनामा लिहून दिल्याने प्रकरण शांत झाले. मात्र, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने पिंपळगाव बसवंत टोल नाका पुन्हा एकदा चर्चेत आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here