Home Breaking News 🛑 अनफिट असल्यामुळं पोलीस कर्मचारी करोनाला पडताहेत बळी; राज्यात ९८ पोलिसांचा मृत्यू...

🛑 अनफिट असल्यामुळं पोलीस कर्मचारी करोनाला पडताहेत बळी; राज्यात ९८ पोलिसांचा मृत्यू 🛑

159
0

🛑 अनफिट असल्यामुळं पोलीस कर्मचारी करोनाला पडताहेत बळी; राज्यात ९८ पोलिसांचा मृत्यू 🛑

मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 30 जुलै : ⭕ लॉकडाउनमध्ये लागू करण्यात आलेल्या नियमावलीच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलिसांना करोनाचा सर्वाधिक संसर्ग झाला आहे. करोनाबाधित पोलिसांची एकूण संख्या ८ हजार ९५८वर पोहोचली आहे. तर, ९८ पोलिसांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांच्या मृत्यूमागे त्यांची अयोग्य जीवनशैली कारणीभूत असल्याचा दावा एका अहवालातून समोर आला आहे.

अयोग्य जीवनशैली, प्रकृतीच्या तक्रारी, असंतुलीत आहार यासगळ्यांचा अप्रत्यक्षरित्या प्रभाव पोलिसांवर होत आहे. तासंतास ड्युटीवर असल्यानं व्यायामाचा अभाव तसंच, ड्युटीसाठी सतत बाहेर असल्यामुळं बाहेरील खाद्यपदार्थामुळं पोलिसांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. यामुळंच रोगप्रतिकार शक्तीही कमी झाली असल्याची शक्यता आहे. पोलिस दलातील काही कर्मचाऱ्यांना या समस्यांमुळं करोना संसर्गामुळं जीव गमवावा लागला आहे. यापुढं पोलिसांच्या आरोग्याबाबतीत यापुढे अधिक काळजी घेण्यात येईल, जेणेकरून त्यांची रोग प्रतिकारशक्ती वाढेल, असं सह पोलिस आयुक्त नवल बजाज यांनी सांगितलं.

पोलिसांमधील करोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता पोलिस प्रशासनानं काही उपाययोजनाही आखल्या आहेत. कंटेन्मेंट झोनमध्ये तैनात असलेल्या पोलिसांना ड्युटीनंतर दोन ते तीन दिवसांची सुट्टी देण्यात येत आहे. जेणेकरून त्यांना आराम करण्यास वेळ मिळेल. असंही बजाज यांनी म्हटलं आहे.

मागील २४ तासांत राज्यात २३६ पोलीस करोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले, तर एकाचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आत्तापर्यंत ९८ पोलिसांचा करोनामुळं मृत्यू झाला आहे. त्यामुळं ८ हजार ९५८ पोलिसांवर करोनावर उपचार सुरु आहेत. त्यातील ६ हजार ९६२ जणांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळं राज्यात सध्या १ हजार ८९८ अॅक्टिव्ह पोलिस असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

पोलिस दलामधील संसर्गाची व्याप्ती पाहता त्यांना सी व्हिटॅमिन गोळ्या, मास्क, फेस शिल्ड, सॅनिटायझर याचा पुरवठा करण्यात येत आहे. पोषक आहार तसेच व्यायामाचे धडेही पोलिसांना देण्यात आले आहेत. करोना पॉझिटिव्ह आलेल्या पोलिसांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी पोलिस कुटुंब आरोग्य योजनेत या आजाराचा समावेश करण्यात आला. इतकेच नाही तर मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक रुग्णालयात पोलिसांवर उपचारांची व्यवस्था करण्यात आली. याचाच परिणाम म्हणजे पोलिसांचे या आजारातून बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. पोलिसांवरील ताण, त्यांच्यातील संसर्ग कमी करायचा असेल तर सर्वसामान्य नागरिकांनी नियमांचे पालन करायला हवे, असे मत या व्यक्त करण्यात येत आहे.⭕

Previous article🛑 फ्लिपकार्ट Quick सर्विस लाँच, फक्त ९० मिनिटात सामानांची डिलिव्हरी 🛑
Next articleदेवळा वाखारी गावात पुन्हा जनता करफ़ू. मास्क बांधणे बंधनकारक.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here