• Home
  • 🛑 फ्लिपकार्ट Quick सर्विस लाँच, फक्त ९० मिनिटात सामानांची डिलिव्हरी 🛑

🛑 फ्लिपकार्ट Quick सर्विस लाँच, फक्त ९० मिनिटात सामानांची डिलिव्हरी 🛑

🛑 फ्लिपकार्ट Quick सर्विस लाँच, फक्त ९० मिनिटात सामानांची डिलिव्हरी 🛑

मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 30 जुलै : ⭕ ई-कॉमर्स कंपनी Flipkart ने नवीन सर्विस लाँच केली आहे. ही फ्लिपकार्टची नवीन सर्विस आहे. या सर्विसला Flipkart Quick असे नाव दिले आहे. फ्लिपकार्ट क्विक कंपनी एक हायपर लोकल डिलिव्हरी सर्विस आहे. या सर्विस अंतर्गत तुम्हाला फक्त ९० मिनिटात तुमचे सामान घरी पोहोचू शकते. या सर्विसमध्ये तुम्ही २ तासांचा स्लॉट आपल्या सुविधेनुसार बुक करु शकतात. कस्टमर या सर्विस अंतर्गत दिवसभारात कधीही ऑर्डर प्लेस करु शकतात.

या सर्विसचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्हाला कमीत कमी २९ रुपयांचा डिलिव्हरी चार्ज द्यावा लागेल. सुरुवातीला ही सर्विस बेंगळुरूमधील काही भागात उपलब्ध करण्यात आली आहे. पुढील काही महिन्यात कंपनी ६ नवीन शहरांत ही सर्विस सुरु करणार आहे. फ्लिपकार्टची ही सर्विस निश्चित पणे ग्राहकांसाठी खास असणार आहे. फ्लिपकार्टची भारतात सर्वात जास्त टक्कर अॅमेझॉनशी होते. त्यामुळे फ्लिपकार्टनंतर अॅमेझॉन सुद्धा ही सर्विस सुरू करण्याची शक्यता आहे. सध्या कोणतीही ई-कॉमर्स कंपनी इतकी फास्ट सर्विस देत नाही.

या सर्विस अंतर्गत तुमही २ हजारांहून अधिक प्रोडक्ट्सची ऑर्डर करू शकतात. यात ग्रॉसरी, डेरी, मीट, मोबाईल, इलेक्ट्रॉनिक अॅक्सेसरी आणि स्टेशनरी यासारख्या उत्पादनाची ऑर्डर करु शकतात. या सर्विस अंतर्गत कंपनी सकाळी ६ वाजेपासून ते रात्री १२ वाजेपर्यंत डिलिव्हरी करणार आहे. सध्या फ्लिपकार्ट प्लस मेंबर्सला वनडे डिलिव्हरी मिळते. म्हणजेच ऑर्डर प्लेस केल्यानंतर ग्राहकांना त्यांचे सामान पोहोचवले जाते.

या सर्विससाठी फ्लिपकार्ट अडवॉन्स लोकेशन मॅपिंगचा वापर करणार आहे. ज्यामुळे कमीत कमी वेळात ग्राहकांना त्यांची ऑर्डर पोहोचवता येवू शकते. अडवान्स लोकेशन मॅपिंग अंतर्गत ग्राहकांच्या लोकेशनची चांगली माहिती मिळेल. त्यामुळे सामान डिलिव्हरी करणे सोपे जाईल.⭕

anews Banner

Leave A Comment