Home Breaking News 🛑 तुमचा मास्क Original आहे का? २१ लाखाच्या बनावट N-95 मास्कसह एकाला...

🛑 तुमचा मास्क Original आहे का? २१ लाखाच्या बनावट N-95 मास्कसह एकाला अटक! 🛑

107
0

🛑 तुमचा मास्क Original आहे का? २१ लाखाच्या बनावट N-95 मास्कसह एकाला अटक! 🛑

मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 30 जुलै : ⭕ कोरोनाच्या विषाणूंपासून बचावासाठी मास्क आणि सेनिटायझरचा वापर देशात मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सेनिटायझर आणि मास्क तयार करणाऱ्या अनेक कंपन्या कोरोनाच्या काळात नावारूपाला आलेल्या आहेत. देशात सध्या सेनिटायझर आणि मास्कची वाढती मागणी बघून नामांकित कंपन्यांची नावे वापरून मोठ्या प्रमाणात बनावट मास्क आणि सेनिटायझर बाजारात दाखल होत आहेत. अशाच एका नामांकित कंपनीचे नाव वापरून बनावट एन – ९५ मास्कची विक्री करणाऱ्या वितरकाला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. त्याच्याजवळून पोलिसांनी २१ लाख ३९ हजार रुपये किंमतीच्या बनावट एन-९५ मास्कचा (N-95 Mask) साठा हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट ३ ने केली आहे. सफदर हुसेन मोहम्मद जाफर मोमीम (४०) असे अटक करण्यात आलेल्या वितरकाचे नाव आहे. भिवंडीत राहणारा सफदर हा कोरोना सुरू झाल्याच्या काळापासून बनावट मास्कची विक्री करीत असल्याची माहिती समोर येत आहे.

मुंबईतील लोअर परळ या ठिकाणी एक इसम मास्क तयार करणाऱ्या ‘विनस’ (Venus) या नामांकित कंपनीचे नाव वापरून बनावट एन- ९५ मास्कची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट ३ च्या पथकाला मिळाली. युनिट ३ प्रभारी पोलीस निरीक्षक अशोक खोत, पो. नि. नितीन पाटील यांनी विनस कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या कंपनीच्या अधिकाऱ्यांसह युनिट ३ चे प्रभारी पोलीस निरीक्षक अशोक खोत, पो.नि.नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने पोद्दार मिल कंपाउंड, लोअर परळ येथे सापळा रचून एकाला टेम्पोसह ताब्यात घेऊन टेम्पोची झडती घेतली असता त्यात मोठ्या प्रमाणात विनस लिहलेले एन ९५ मास्क सापडले.

पोलीस पथकाने ताब्यात घेतलेल्या सफदर मोमीन यांच्यासह टेम्पो ताब्यात घेऊन चौकशी केली असता हे सर्व मास्क विनस कपंनीच्या नावाखाली होलसेल विक्रेत्याला विकत असल्याची माहिती दिली. विनस कंपनीच्या अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी सफदर मोमीन याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याच्याजवळून सुमारे २१ लाख ३९ हजार रुपये किमतीचे बनावट एन -९५ मास्क आणि टेम्पो जप्त करण्यात आला असल्याची माहिती प्रभारी पोनि खोत यांनी दिली. मुंबईसह ठाणे, नवीमुंबई तसेच आसपासच्या शहरात या बनावट एन ९५ ची मोठ्या प्रमाणात विक्री करीत असल्याची माहिती अटक करण्यात आलेल्या वितरक सफदर याने पोलिसांना दिली आहे. १५० ते २०० रुपयांना या मास्कची विक्री होत असून अटक करण्यात आलेल्या वितरकाकडून कुठे कुठे हे मास्क पोहोचवले जात आहेत, त्याचा तपास सुरु असल्याचे खोत यांनी सांगितले.⭕

Previous article🛑 ” फायद्याची गोष्ट “…! या तारखेपासून amazon मोठा शाॅपिंग इव्हेंट…! आरध्यापेक्षा कमी किंमतीत वस्तु 🛑
Next article🛑 फ्लिपकार्ट Quick सर्विस लाँच, फक्त ९० मिनिटात सामानांची डिलिव्हरी 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here