Home परभणी जिंतूर तालुक्यातील बामणी महसूल मंडळ वगळले गेल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी

जिंतूर तालुक्यातील बामणी महसूल मंडळ वगळले गेल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी

391

आशाताई बच्छाव

IMG-20220908-WA0000.jpg

जिंतूर तालुक्यातील बामणी महसूल मंडळ वगळले गेल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी

शत्रुघ्न काकडे पाटील:-ब्युरो चिफ (युवा मराठा न्युज नेटवर्क परभणी)

(परभणी)जिंतूर :-पावसाने उघडीप दिल्याने तालुक्यातील बामणी मंडळात पीकांचे अतोनात नुकसान झाले आहे. यामुळे प्रशासनाकडून पीकांचे पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी मंडळातील ग्रामस्थांनी केली आहे.
पावसाने उघडीप दिल्याने खरिपाची बहरलेली पिके सुकून लागली शेतकरी हतबल झाला. असून या वर्षी खरीप पेरणी साठी सुरुवातीला योग्य पाऊस झाला त्यानंतर खरिपाची पिके चांगली बहरलेली होती पण मधेच
अतिवृष्टी सदृश पाऊस झाल्याने शेतामध्ये सर्वत्र पाणीच पाणी झाले होते त्यामुळे पिकांची वाढ खुंटली होती आणि जमिनीचे पडल्या होत्या त्यानंतर पावसाने खंड दिला. पिके फुलोऱ्यात असताना करपली गेली त्यामुळे पिके वाळली शेतकरी हतबल झाला. आणि नुकसान भरपाई साठी मागणी करू लागले पंचवीस दिवस पावसाचा खंड असेल तर त्या स्थितीत नुकसान ग्राहय धरले जाते असा शासन अनुमान आहे. परंतु
लोकप्रतिनिधींनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी १० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या कालावधीत पंधरा दिवस खंड असणाऱ्या महसूल मंडळाचा अहवाल मागवला होता. परंतु जिंतूर तालुक्यातील अनेक मंडळांचा यात समावेश असताना बामणी मंडळ वगळले गेले. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे बामणी मंडळाचा ही सदर मंडळामध्ये समावेश करावा व नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे याबाबत तहसीलदार जिंतूर यांना निवेदन देणार असल्याची माहिती शेतकऱ्याकडून मिळत आहे.

Previous articleमहिला टोल कर्मचारी अन् पोलीस पत्नीत तुंबळ हाणामारी
Next articleयुनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी विमा कंपनीशी फोन द्वारे संपर्क होत नसल्याने शेतकरी वर्गातून संताप.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.