Home नांदेड श्री ज्ञानेश्वर मंदिर मुखेड येथे अखंड हरिनाम सप्ताह व भागवत कथेचे आयोजन

श्री ज्ञानेश्वर मंदिर मुखेड येथे अखंड हरिनाम सप्ताह व भागवत कथेचे आयोजन

53
0

आशाताई बच्छाव

IMG-20220913-WA0030.jpg

श्री ज्ञानेश्वर मंदिर मुखेड येथे अखंड हरिनाम सप्ताह व भागवत कथेचे आयोजन
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

मुखेड येथील श्री ज्ञानेश्वर मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन दि.13 ते दि. 20 सप्टेंबर  या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.  सप्ताह कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताह सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे.              मुखेड येथील डॉ. हेडगेवार चौक येथे पुरातन श्री संत ज्ञानेश्वर मंदिर संस्थान आहे. या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. ह.भ.प. वैकुंठवासी पांडुरंग महाराज कवठेकर, ह.भ.प.वैकुंठवासी हसेन्ना महाराज कोलमकर, ह.भ.प. रघुनाथ महाराज कदम यांच्या कृपेने प्रतिवर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. यावर्षी सप्ताहाचे 105 वे वर्षे आहे. सप्ताह कालावधीत पहाटे चार ते सहा काकड आरती, सकाळी सहा ते नऊ ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण, सकाळी दहा ते बारा वाजता गाथा भजन, दुपारी दोन ते पाच भागवत कथा, रात्री  आठ ते दहा किर्तन आदी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.ह.भ.प.सटवा महाराज रोडगे हे गाथा भजन प्रमुख आहेत. ह.भ.प. दत्ता गुरुजी भेंडेगावकर हे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण प्रमुख आहेत. सप्ताह कालावधीत ह भ प शिवा उर्फ बाळू महाराज, जिल्हा मेदक, ह भ प गंगाधर महाराज वसुरकर, ह भ प ब्रह्मानंद महाराज, ह भ प सूर्यकांत महाराज, हभप भानुदास महाराज सावळेश्वरकर, ह भ प आत्माराम महाराज रायवाडीकर,  ह भ प भगवान महाराज महाळंगीकर,  यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. माधव मनोहर कवटीकर यांच्यातर्फे दिनांक 19 रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. पालखी मिरवणूक दिनांक 19 रोज सोमवारी दुपारी दोन वाजता मुखेड शहरातील मुख्य मार्गाने काढण्यात येणार आहे. सप्ताह यशस्वीतेसाठी संभाजी शिरसे, शंकर पोतदार विश्वनाथराव कोलमकर, माऊली सेवा मंडळ मुखेड, हभप पापा महाराज विठ्ठल मंदिर मुखेड, ह भ प भानुदास महाराज सावळेश्वरकर, ह भ प रमेश महाराज कवठेकर यांनी पुढाकार घेतला आहे. श्री ज्ञानेश्वर मंदिरात आयोजित अखंड हरिनाम सप्ताह भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन  श्री ज्ञानेश्वर मंदिर व्यवस्थापन व सप्ताह समिती व पुजारी ह भ प उद्धव महाराज कवटीकवार  यांनी केले आहे.

…..भागवत कथेचे आयोजन….

मुखेड येथील श्री ज्ञानेश्वर मंदिरात भागवत कथेचे आयोजन दुपारी दोन ते पाच या कालावधीत करण्यात आले आहे. ह.भ.प.श्री योगेश्वर महाराज बेटमोगरेकर हे भागवत कथा सांगणार आहेत. या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजन समितीने केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here