Home Breaking News *सी.पी.आर.रूग्णालयात होणार नाँन* *कोरोना रूग्णसेवा*

*सी.पी.आर.रूग्णालयात होणार नाँन* *कोरोना रूग्णसेवा*

113
0

*सी.पी.आर.रूग्णालयात होणार नाँन* *कोरोना रूग्णसेवा*

*युवा मराठा न्यूज*

कोल्हापूर जिल्ह्यात गेले सात महिने सी.पी.आर. रुग्णालय कोरोनाबाधित रुग्णांच्या सेवेत आहे. जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाला असून रुग्णसंख्येत घट झाली आहे. टप्प्याटप्प्याने सी.पी.आर. रुग्णालयाचे विभाग नॉन कोरोना रुग्णांसाठी सुरू करा, अशी सूचना वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे केली आहे. सी.पी.आर. प्रशासनाने नॉन कोरोनाबाधित रुग्णसेवा सुरू करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. आठवडाभरात सी.पी.आर.मध्ये नॉन कोरोना रुग्णांवर उपचार सुरू केले जाणार आहेत.
सी.पी.आर. मधील सर्व विभाग सध्या बंद असून येथील वॉर्डमध्ये फक्त कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
नॉन कोरोना रुग्णांसाठी कसबा बावडा येथील रुग्णालय सेवेत आहे. येथे प्राथमिक तपासणी करून रुग्णांना शहरातील अन्य खासगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविले जात आहे. लवकरच ही फरफट थांबणार आहे. कारण सी.पी.आर. नॉन कोरोना रुग्णसेवेत येणार आहे.
सी.पी.आर.मधील दूधगंगा इमारत कोरोनाबाधित रुग्णांसाठी राखीव ठेवली जाणार आहे. सध्या सी.पी.आर.च्या अन्य इमारतीमध्ये उपचार घेणार्‍या बाधित रुग्णांचे स्थलांतर दूधगंगा इमारतीमध्ये केले जाणार आहे. अन्य उर्वरित इमारतीमध्ये टप्प्याटप्प्याने नॉन कोरोना रुग्णांवर उपचार सुरू केले जाणार आहेत. त्यासाठी युद्धपातळीवर यंत्रणा गतिमान झाली आहे. त्याच्या नियोजनासाठी समिती स्थापन केली आहे. यामध्ये औषधवैद्यकशास्त्र विभागप्रमुख, वैद्यकीय अधीक्षक, सर्व पथकप्रमुख, अधिसेविका यांचा समावेश आहे. सोमवारी (दि. 2) या समितीच्या पुढील नियोजनाबाबत बैठकीचे आयोजन केले आहे.
अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के यांनी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालकांच्या सूचनेनुसार कार्यालयीन आदेश काढला आहे. कोरोना रुग्णसंख्येचा आढावा घेऊन रुग्णालयातील दूधगंगा इमारतीमध्ये अन्य वॉर्डमधील रुग्ण स्थलांतरित करावेत. रुग्ण स्थलांतरित करताना रुग्णांच्या जीवितास धोका निर्माण होणार नाही, याची विशेष खबरदारी घ्यावी. रिकाम्या होणार्‍या इमारती, वॉर्ड, उपकरणांसह अन्य यंत्रसामग्री निर्जंतुकीकरण करून घ्यावे. सूक्ष्मजीवशास्त्र विभागाकडून निर्जंतुकीकरण योग्य प्रकारे झाले असल्याची खात्री करून घ्यावी. त्यानंतर नॉन कोरोना रुग्णसेवा सुरू करावी, असे आदेशात म्हटले आहे.

मोहन शिंदे जिल्हाप्रतिनिधी
कोल्हापूर .

Previous article*बसस्थानकात महिला मदत केंद्र सुरू करावीत*
Next article*युवा मराठा न्युज”च्या पाठपुराव्यामुळे अखेर मोबाईल टाँवर कार्यान्वित*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here