• Home
  • *बसस्थानकात महिला मदत केंद्र सुरू करावीत*

*बसस्थानकात महिला मदत केंद्र सुरू करावीत*

*बसस्थानकात महिला मदत केंद्र सुरू करावीत*

*युवा मराठा न्यूज* कोल्हापूर प्रतिनिधी

राज्यातील सर्व एस.टी. बस स्थानकांमध्ये महिलांना पटकन मदत मिळेल अशी कोणतीही सुविधा उपलब्ध नसते. त्यामुळे याची राज्य गुन्हे अन्वेशन विभागाच्या महिला अत्याचार प्रतिबंधक शाखेने गंभीर दखल घेतली आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक एस.टी. बस स्थानकात महिला मदत केंद्र सुरू करा, असे पत्रच मुंबई पोलिसांना लिहिण्यात आले आहे.
बऱ्याचदा महिला एकटय़ानेच एस.टी.बसने प्रवास करतात. अनेकदा त्यांना स्थानकांमध्ये नाहक त्रासाला सामोरे जावे लागते. पण स्थानकांमध्ये मदत केंद्रे नसल्याने महिला हबतल होऊन नाहक त्रास मुकाटय़ाने सहन करतात. मात्र राज्य गुन्हे अन्वेषन विभागाच्या महिला अत्याचार प्रतिबंधक शाखेने याची दखल घेतली आहे.
प्रत्येक एस.टी.बस स्थानक महिलांसाठी सुरक्षित व्हावे यासाठी या शाखेने मुंबई पोलीस आयुक्तालयास पत्र लिहून काही महत्वाच्या उपाययोजना सुचविल्या आहेत.
बऱ्याच वेळा खाजगी प्रवासी बसेस रात्रीच्या वेळेस त्यांना सोयीस्कर असलेल्या ठिकाणी थांबविल्या जातात आणि ही ठिकाणे महिलांच्या दृष्टीने असुरक्षित असतात. त्यामुळे सर्व विभागातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांच्या माध्यमातून रात्रीच्या वेळेस खासगी प्रवास गाडय़ा एस.टी. स्टॅन्ड जवळच थांबतील याची खबरदारी घ्यावी, असेही सुचविण्यात आले आहे.

परिवहन आयुक्त,डेपो मॅनेजर यांना पत्र व्यवहार करून एस.टी. महामंडळाच्या मदतीने प्रत्येक एस.टी.स्टॅन्डमध्ये महिलांसाठी मदत केंद्र सुरू करावे व त्यावर ठळक अक्षरात ‘ महिला मदत केंद्र’ असा फलक लावावा.
स्वतंत्र स्वच्छतागृह पुरवणेबाबत पाठपुरावा करावा.
प्रत्येक स्थानकात पटकन निदर्शनास येईल अशा जागी एक फलक लावून त्यावर जवळच्या महिला आधार गृहाचा किंवा महिला संरक्षण गृहाचा पत्ता व दुरध्वनी क्रमांक लिहावा.
तसेच महिला कल्याण क्षेत्रात चांगले काम करणाऱ्या नामांकित अशासकिय संस्थांचा पत्ता व संपर्क क्रमांक लिहावा.
महिलांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांकासह नजीकच्या पोलीस ठाण्याचा क्रमांक देखील लिहावा.

anews Banner

Leave A Comment