Home नांदेड आरोग्य उपकेंद्राच्या बांधकामासाठी १ कोटी ९ ० लाखांचा निधी मंजूर – आ.डॉ.तुषार...

आरोग्य उपकेंद्राच्या बांधकामासाठी १ कोटी ९ ० लाखांचा निधी मंजूर – आ.डॉ.तुषार राठोड ▶️ मतदारसंघातील आरोग्य सुविधा भक्कम करणार – आ.डॉ. तुषार राठोड

68
0

राजेंद्र पाटील राऊत

आरोग्य उपकेंद्राच्या बांधकामासाठी १ कोटी ९ ० लाखांचा निधी मंजूर – आ.डॉ.तुषार राठोड

▶️ मतदारसंघातील आरोग्य सुविधा भक्कम करणार – आ.डॉ. तुषार राठोड

मुखेड / प्रतिनिधी (मनोज बिरादार )

मुखेड तालुक्यातील मौजे सकनुर व वर्ताळा येथील आरोग्य उपकेंद्रांना प्रत्येकी ६० लाख रुपये मंजूर झाले असून मुखेड तालुका आरोग्य अधिकारी ( टीएचओ ) कार्यालय बांधकामासाठी ७० लक्ष रुपयांचा भरघोस निधी मंजूर झाला आहे , असा एकूण १ कोटी ९ ० लाख रुपयांचा निधी लवकरच प्राप्त होणार असल्याची माहिती आ . डॉ . तुषार राठोड यांनी दिली . तालुका आरोग्य विभागाची नूतन टोलेजंग इमारत उभारणार असून तालुक्याच्या वैभवात भर टाकणारी ठरणार आहे . याबाबाबत राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला असून त्यास यश आले असल्याची माहिती आ.डॉ. राठोड यांनी प्रसार माध्यमांसी बोलतांना दिली आहे ..

मुखेड तालुक्यातील सकनूर व वर्ताळा येथील ग्रामस्थांच्या सोयीसाठी आरोग्य विभागाकडून उपकेंद्र मंजूर झाल्यानंतर इमारत बांधकामासाठी निधीची
१ प्रतीक्षा होती . यासाठी शासकीय स्तरावार पाठपुरावा सुरू होता त्यासाठी आवश्यक जागेचा शोध घेतला जात असतानाच ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने संबंधीत उपकेंद्रांच्या बांधकामासाठी जागेची उपलब्धता करून देण्यात आली.

मुखेड तालुक्यातील मौजे सकनुर व वर्ताळा या गावांना आरोग्य उपकेंद्रांना मंजुरी मिळून बरीच वर्ष झाली.परंतु निधीअभावी या उपकेंद्रांचे बांधकाम अनेक वर्षापासून रखडले होते.त्यासाठी आता भरघोस निधी प्राप्त झाला आहे त्याचे काम लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे आ.डॉ. राठोड यांनी सांगितले याच बरोबर सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्राचा कारभार चालणारे मुखेड शहरातील मुख्य केंद्र असलेले तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचे कार्यालय मागच्या अनेक वर्षापासून उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीमध्ये सुरू आहे.इमारतीत अनेक गैरसोयी निर्माण झाली आहे.

आ.डॉ. तुषार राठोड यांनी ही बाब लक्षात घेऊन राज्य शासनाच्या महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य विभागांकडे सातत्याने पाठपुरावा करून या उपकेंद्रांच्या बांधकामासाठी प्रत्येकी ६० लाख रुपये मंजुर करुन घेतले.या कामांसाठी १ कोटी २० लाखांचा निधी आरोग्य विभागाच्या १५ व्या वित्त आयोगातून मंजूर केला आहे . तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचे स्वतंत्र कार्यालय असावे अशी मागणी शासनाकडे प्रलंबित होती.

या इमारतीच्या बांधकामासाठी महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पंधराव्या वित्त आयोगातून ७० लक्ष रुपये आ.तुषार राठोड यांच्या प्रयत्नातुन मंजुर झाले आहेत.मुखेड शहरात येत्या काळात तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाची टोलेजंग इमारत उभारण्यात येणार असून मुखेडच्या वैभवात भर टाकणारी असणारे आहे,असे आ.तुषार राठोड यांनी सांगितले.

कार्येसम्राट आ .डॉ तुषार राठोड यांनी तालुक्यातील आरोग्य सुविधा भक्कम करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करुन घेतल्याने तालुक्यातील नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे. यामुळे त्यांच्या कार्योचे विविध स्तरांतून कौतुक होताना पाहावयास मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here