Home सोलापूर सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणाला तिरंग्याच्या स्वरूप देण्यात आले.

सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणाला तिरंग्याच्या स्वरूप देण्यात आले.

74
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20220813-141638_WhatsApp.jpg

सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणाला तिरंग्याच्या स्वरूप देण्यात आले.

युवा मराठा न्यूज नेटवर्क
सोलापूर जिल्हा चीफ biro महादेव घोलप.

सोलापुर जिल्ह्याचा आत्मा म्हणजे उजनी धरण..

एकदा यशवंतरावांनी करमाळ्याचे नामदेवराव जगताप आणि पंढरपूरच्या औदुंबर आण्णा पाटील यांना बोलावून घेतलं आणि विचारलं.. “धरण की विद्यापीठ” बोला तुमच्या जिल्ह्याला दोन्हीपैकी काय हवं..
दूरदृष्टी असणारे नामदेवराव आणि औदुंबर आण्णा एका स्वरात म्हणाले ‘धरण पाहिजे, अहो साहेब विद्यापीठ नसलं तर उद्या आमच्यातली लेकरं पुण्या-मुंबईला जातील पण एकदा पाणी आलं तर हे माळरान तरी फुलेल..’ मोठ्या साहेबांनी धरण मंजुर केलं..

हजारो गावं उठली, विस्थापित झाली, पण पुढे क्रांती होणार होती म्हणून जिल्हा हे चटके सोसायला तयार झाला. भूमिपूजन व पायाभरणी यशवंतरावांच्या शुभहस्ते ठरली. भुमीपुजनाआधी यशवंतराव पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला आले. दर्शन घेताना गहिवरले.. अश्रूंचे थेंब डोळ्यांत तरळताना अवघ्या संतभुमीने पाहिले..

दर्शन करतेवेळी ते म्हणाले, हे विठ्ठला, मी तुझी चंद्रभागा अडवतोय, मला माफ कर.. एकवेळ तुझ्या भक्तांना स्नानाला पाणी मिळणार नाही पण आषाढी कार्तिकीला तुझा गजर करीत शेकडो किमी वरून पायी जो वारकरी तुझे रूप डोळ्यांत साठवण्यासाठी येतो आहे त्यांच्यासाठी मी तुझी चंद्रभागा अडवली आहे.. विठ्ठला तुझ्या चंद्रभागेचे पाणी माझ्या शेतकऱ्यांच्या शेताशेतात जाईल.. मनगटासारखी कणसं येतील त्या कणसातील जोंधळ्याच्या दाण्यादाण्यात ते तुझं रूप पाहतील…

यशवंतराव गहिवरले. वेदनेला मुरड घालत ते पायभरणी समारंभाला गेले अन् तिथूनच सुरू झाली खरी क्रांती..

आजही कॅनाॅल, ओढ्या नाल्यांचे देखील पाट भरून वाहतात कदाचित त्या विठ्ठलाने जणू यशवंतरावांच्या “हाकेला ओ” दिली असावी. गेले कित्येक वर्ष झालं उजनीच्या या पाण्यामुळे पंढरपूर माढा करमाळ्यात ऊस, केळीचे हिरवेगार मळे मन मोहून टाकतात. मंगळवेढा अन् बार्शीची ज्वारी तर भुक हरपुनंच टाकते, सांगोल्याच्या डाळिंबानी तर परदेश भ्रमंतीच केलीय.. आता शिवार सारं डोलत आहे.. हे सगळं झालंय उजनी मायमुळं अन् दूरदृष्टी असणारे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्यामुळे…
भारत माता की जय
भारताला स्वातंत्र्य मिळवून 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संपूर्ण देशामध्ये हर घर तिरंगा योजना भारत सरकारने राबवण्याचा निर्णय घेतला आहे त्यातच आपल्या सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणावर उजनी धरण प्रशासनाने या योजनेचा भाग म्हणून आपल्या उजनी धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याला तिरंग्याचे स्वरूप देऊन अमृतमहोत्सवी वर्ष साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचेच दृश्य आज गेली तीन दिवस झालं हे चालू केले आहे त्याचा हा
मनमोहक नजरा.

Previous articleमुंबई -गोवा महामार्गावरील खड्डे 8 दिवसात न भरल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करणार रास्ता रोको
Next articleचंद्रपूर गडचिरोली महामार्गावर अपघात ;चार जण जागीच ठार
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here