Home सामाजिक फक्त तीन अक्षरांचा शब्द “सबंध”

फक्त तीन अक्षरांचा शब्द “सबंध”

107
0

राजेंद्र पाटील राऊत

फक्त तीन अक्षरांचा शब्द
“सबंध”
वाचकहो,
“सबंध” या विषयावर लिहायचे म्हटले तर एक मोठाच प्रबंध किंवा ग्रंथही तयार होऊ शकतो.या जीवनात आपल्याला वेगवेगळ्या सबंधाना सामोरे जावे लागते तर काही सबंध नाईलाजास्तव समाजाच्या लाजेखातर जोपासत बसावे लागतात.मग खरा सबंध कोणता? याच गोष्टीचा या लेखातून आपण सडेतोड परामर्श करणार आहोत. -राजेंद्र पाटील राऊत मुख्य संपादक
नातेसबंध– हे एक असे मायाजळ असते की,कुणीना कुणी कधीना कधी या मायाजाळ्यात नक्कीच गुरफटतो.नातेवाईक म्हणजे आपल्या प्रगतीवर जळणारे,आणि आपल्या दुःखात गावभर आपल्या गरीबीची थट्टा उडवून महाप्रसाद वाटणारे म्हणजे नातेसबंधी…प्रसंगी नातेसबंधी आपलीच बदनामी करुन आपल्यालाच नालायक ठरवून स्वतः मात्र खानदानी लायकीदार सारखे गावभर उंडारत फिरतात म्हणजे एकंदरीत काय तर आपले ठेवायचे झाकून,व दुसऱ्याचे पहायचे वाकून या प्रकारात मोडणारी हरामी नातेसबंध दाखविणारी सुध्दा काही मंडळी असते.त्याशिवाय सख्खा भाऊ पक्का वैरी अशा पध्दतीच्या घटनाही नातेसबंधात बघावयास मिळतात.पण…नाईलाजास्तव व समाजाच्या लाजेखातर हे नातेसबंध जोपासले जातात.
घरोब्याचे सबंध-घरोब्याचे सबंध अर्थात तुम्ही एखाद्याशी अत्यंत जवळीकतेने एखादे नाते प्रस्थापित करता व ते निभावणौयाचा प्रयत्नसुध्दा करतात त्यावेळी मात्र समाजात असलेली डोमकावळे व नावाला असलेली नातेवाईक नावाची बांडगुळ तुम्हांला षडयंत्र रचून बदनाम करण्यासाठी टपलेली असतात हा इतिहास असला तरी आपल्याला या आशा चक्रयुव्हात अडकविण्यासाठी टपलेली हि बांडगूळ मात्र खरा इतिहास विसरुन त्यांनी कितीही घरोब्याचे सबंध इतर जातीमध्ये जोडले तरी त्यांना सत्याचा आरसा दाखवितांना आपल्या ढुंगणाखालील अंधार मात्र दिसत नाही हिच या समाजातील सर्वात मोठी शोकातिंका झाली आहे.
प्रेमसबंध-हा एक असा भुलभुलैय्याचा प्रकार आहे की,शारीरिक आकर्षणापोटी एखाद्याची लेकी बाळी फसवायची तिला गळाला लावायचे सुरुवातीला प्रेमसबंधाचे गोंडस नाव द्यायचे आणि मग नंतर फक्त शारीरिक भुक भागविण्यासाठी व स्वतः ला सुटलेला माज जिरविण्यासाठी त्या लेकी बाळींचा वापर करायचा आणि खुलेआम लफडे करायचे हि आजकाल स्वतः ला उच्चभ्रु व प्रतिष्ठित समजले जाणारे पांढऱ्या पोशाखातील डोमकावळ्याबाबत सर्रासपणे बघावयास मिळते.खरे प्रेम म्हणजे काय? तर…त्याग व समर्पणाची मुर्तीमंत प्रतिमा असते.
मित्रसबंध- आजकाल मित्र जरुर असावा,आपल्या प्रत्येक दुःख सुखाच्या प्रसंगात सहभागी होणारा.आपण सांगितलेले हदयातच जपून ठेवणारा व मोलाचा सल्ला देणारा असा मित्र प्रत्येकाने जरुर बाळगावा.मात्र त्याउलट आजकालच्या मित्रांची खरी व्याख्या पार बदलून गेली आहे.मित्रच मित्राला वाममार्गाला म्हणजे दारु,सिगारेट,गुटखा सारख्या व्यसनांच्या आहारी ढकलून मित्रांच्याच आया बहिणीवर वाईट नजर ठेवणा-यांची प्रवृती जास्त वाढत चालली आहे.आणि हे सगळ एका मोबाईलमुळे बिघडत चालले आहे.संस्कार संस्कृती शिल्लक राहिलीच नाही त्यामुळे आताच्या जमान्यात खरे मित्र मिळणेही अवघड झाले आहे.
मग खरे सबंध कोणते?-माणूसकी धर्म आणि मानवतावादी सबंध हे सगळ्यात श्रेष्ठ म्हणून गणले गेले आहेत.कुणी तरी अडचणीत आहे ,संकटात आहे दुःखात आहे तर त्याच्या पाठीशी अविरतपणे कुठलीही भिती किंवा तमा न बाळगता खंबीरपणाने उभे राहून निस्वार्थ भावनेने सतत मदतीचा हात देण्याबरोबरच एखाद्याचे आयुष्य घडवितांना केलेला त्याग,बलिदान,सर्मपणाची अनमोल अशा कर्तव्याची ईश्वर दरबारी असते म्हणूनच सगळ्या सबंधापेक्षा सर्वश्रेष्ठ माणूसकीचे सबंध असतात.माणसाने माणसासारखेच वागावे आणि मानवता सबंध जोपासावे तरच खरे अर्थाने मानवतावादी शृघ्गंला वाढीस लागेल.नाही तर माणसानेच माणसाचा “युज अँण्ड थ्रो”करायचा म्हणजे केलेले पाप येथेच फेडावे लागते,किडे पडून सडून सडून मरावे लागते हे मर्मभेदक सत्य तरी आम्ही का म्हणून नाकारायचे!

Previous articleएएसपी श्रवण दत्त एस यांची गुन्हेगारांमध्ये दहशत, शेगांव येथे अवैध गुटख्यापाठोपाठ सेक्स रॅकेटचा लावला छडा
Next articleसहाय्यक आयुक्त समाज कल्याण ,गडचिरोली यांचे आवाहन।
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here